मात्र निकालाची तारीख पुढे ढकलली

नाशिक : काही दिवसांपूर्वी मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी व अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यास अतिशय गुप्ततेने नाशिकरोड कारागृहातुन हलवण्यात आले होते. मात्र त्यास एका खटल्यातील सुनावणीसाठी दिल्ली येथे नेण्यात आले होते. 2002 साली अदानी या मोठ्या उद्योजकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा खटला दिल्लीच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्यातील अब्दुल कय्युम अन्सारी उर्फ अबू सालेम (ववय 62) हा मुख्य संशयित आरोपी असल्याने त्याला नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातून मध्यरात्री हलवण्यात आले होते यावेळी बंदोबस्तासाठी सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात 44 पोलीस अंमलदारांच्या बंदोबस्तात नाशिक पोलिसांनी रेल्वेच्या राखीव बोगीतून सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयीन काम आवरून दिल्ली-बंगळुरू-कर्नाटक एक्स्प्रेस मधील एका राखीव बोगीतून त्याला मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात उतरवण्यात आले यादरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मनमाड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता तेथून चांदवडमार्गे पोलिसांच्या ताफ्यात नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. यावेळी त्याच्या भोवती सहस्त्र कमांडोच्या तुकडीचे सुरक्षा कडे होते अबू सलीम ला न्यायालयात चूक सुरक्षा बंदोबस्तात हजर करण्यात आले होते न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने या खटल्याच्या निकालाची तारीख पुढे ढकलली यामुळे त्या 10 सप्टेंबरला पुन्हा सालीमला न्यायालयात नेण्यात येणार का ? सुरुवातीच्या काळात अबू सालेम हा अनेक वर्षापासून मुंबईच्या तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता तेथे त्याच्या जीवितला धोका असल्याने त्यांनी न्यायालयात सांगितले होते त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वीच सालेम यास नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहातील अंडा असेल मध्ये टाकण्यात आले होते. यासंदर्भात गँगस्टर अबू सालेम याचे वकील यतीश देसले यांच्याशी न्यूज ब्लॅक अँड व्हाईटने संपर्क साधत अधिक माहिती जाणून घेतली


![]()











