रामकुंड येथे दर्शनासाठी आलेला पर्यटक गेला वाहून

नाशिक : नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून यामुळे बहुतांश धरणांची पाण्याची पातळी मोठ्याप्रमाणात वाढली आहे .गेल्या 48 तासापासून नाशिक शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे.त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले असून गोदाकाठ परिसरातील दुकाने हटविण्यात आली आहेत.गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ऑरेंज अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, त्याचबरोबर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून तो टप्या-टप्याने वाढणार असल्याने नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे,पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 02532571872 या नंबरवर संपर्क साधण्याचे आव्हान नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पाच गावांचा संपर्क तुटला नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटला आहे नांदूर गावातून शिवरे करंजी, निफाड, दिंडोरी, जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या कडेला असलेल्या चांदोरी,सायखेडा,करणंजवन या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी शिरले असून चांदोरी गावातील प्रसिध्द खंडेराव देवाचे मंदिर पाण्याखाली आले असून आजूबाजूच्या शेतांमध्ये देखील पाणी घुसले आहे. रामकुंड परिसरात पर्यटक वाहून गेला मिळालेल्या माहितीनुसार रामकुंड परिसरात एक पर्यटक वाहून गेला असून,वाहून गेलेल्या पर्यटकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते आहे. दर्शनासाठी आलेला 29 वर्षीय युवक वाहून गेला आहे
![]()











