• Latest
  • Trending
17 वर्ष मतदान करूनही आता नागरिकत्वाचा पुरावा का?

17 वर्ष मतदान करूनही आता नागरिकत्वाचा पुरावा का?

September 28, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

17 वर्ष मतदान करूनही आता नागरिकत्वाचा पुरावा का?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

SIR प्रक्रियेत ‘नो मॅपिंग’मुळे मतदारांमध्ये संभ्रम; कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसांमुळे धाकधूक

नाशिक : वयाच्या १८व्या वर्षी मतदार यादीत नाव आले. त्यानंतर गेली 16-17 वर्षे नियमितपणे मतदान केले. प्रत्येक निवडणुकीत मतदार म्हणून आपली ओळख सिद्ध झाली. मतदार ओळखपत्रही आहे. मात्र आता विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेत जुन्या मतदार यादीशी ‘मॅपिंग’ झाले नसल्याने अशा नागरिकांसमोर पुन्हा कागदपत्रांच्या पडताळणीचे आव्हान उभे राहिले आहे.

SIR प्रक्रियेत अनेक नागरिकांनी BLOकडे आपला फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांच्या नावाची २००२च्या जुन्या मतदार यादीशी किंवा आई-वडिलांच्या नोंदीशी सांगड न जुळल्याने ‘No Link With Previous SIR’ अथवा ‘No Mapping’ असा प्रकार समोर येत आहे. त्यानंतर संबंधित मतदारांना कागदपत्रे सादर करून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना चक्क एक दिवस आधी देण्यात येत आहेत.

या नोटिसांमधील ‘कागदपत्रे सादर न केल्यास मतदार यादीतून नाव डिलीट होऊ शकते’ या स्पष्ट उल्लेखामुळे अनेक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मतदार यादीत नाव असलेल्या आणि नियमित मतदान करणाऱ्या नागरिकांना आता पुन्हा आपली पात्रता कागदपत्रांच्या माध्यमातून सिद्ध करावी लागणार असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

जुन्या यादीतील नाव सापडले नाही म्हणून प्रश्नचिन्ह?

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मतदार यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर अनेक वर्षे मतदानाचा अधिकार बजावला जात आहे. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाच्या विविध प्रक्रियांमधून मतदारांची नोंद, मतदार ओळखपत्र आणि मतदार यादीतील तपशील अद्ययावत झालेले आहेत. मात्र SIRच्या जुन्या नोंदीशी थेट सांगड न जुळल्यास संबंधित मतदारांना अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची वेळ येत आहे.

यामुळे ‘इतकी वर्षे मतदार म्हणून अस्तित्वात असताना आता पुन्हा कागदपत्रांची कसोटी का?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जन्मतारखेनुसार कागदपत्रांची अट

नोटिसीनुसार, जन्मतारखेनुसार वेगवेगळी कागदपत्रे मागविण्यात येत आहेत. १ जुलै १९८७ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींसाठी स्वतःचे ठराविक कागदपत्र, तर त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी स्वतःसोबत आई किंवा वडिलांचे कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २ डिसेंबर २००४ नंतर जन्मलेल्या मतदारांसाठी स्वतःसोबत आई-वडिलांची कागदपत्रे सादर करण्याची अट असल्याचे नोटिसीत सांगण्यात आले आहे.

यामुळे विशेषतः जुन्या काळातील जन्मनोंदी, शाळा सोडल्याचे दाखले किंवा पालकांची कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या कुटुंबांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मतदारांचा अधिकार सुरक्षित राहणे महत्त्वाचे

विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करणे हा आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर SIRसाठी स्वतंत्र माहिती, २००२च्या मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा, कागदपत्रांची माहिती आणि हेल्पडेस्कची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र या प्रक्रियेत पात्र मतदाराचे नाव केवळ जुन्या यादीशी मॅपिंग न झाल्यामुळे गहाळ होऊ नये, तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मतदार यादीतील नाव हे केवळ एका कागदावरील नोंद नसून नागरिकाच्या लोकशाही सहभागाशी जोडलेले आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेत पडताळणी आवश्यक असली, तरी वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या पात्र नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती निर्माण होणार नाही आणि कोणताही पात्र मतदार प्रक्रियात्मक अडचणीमुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, SIR संदर्भातील अधिकृत माहितीसाठी मतदारांनी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती किंवा मतदार हेल्पलाइन १९५० यांचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मी गेल्या 15 ते 16 वर्षांपासून नाशिक मध्ये नियमित मतदान करत आहेत.. आता SIR मध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी नोंदणी झाली. आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील केली आणि आता असा प्रकारचा मेसेज आल्याने मतदार यादीतून नाव रद्द होईल की काय असे वाटत आहेत. फॉर्म भरतांना वडिलांचा, आईचा, आजोबांचा देखील पुरावा दिला.. त्यांचेही रेकॉर्ड निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्याने BLO कडे फॉर्म भरून दिला होता. यावरून निवडणूक आयोगाची कार्यपद्धती किती पारदर्शक आहे हे लक्षात येते.
श्वेतांबरी आहेर, नाशिक

Loading

Tags: CMOMAHARASHTRADEVENDRAFADANVISELECTIONCOMMISIONMAHARASHTRANashikPMOINDIASIR
Previous Post

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

Next Post

नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाल्याने गणेश मंडळांचा संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White