आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

नाशिक : मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन आणि डीजेच्या अतिवापरामुळे पोलिसांकडून गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियम व ध्वनीमर्यादा ओलांडल्याप्रकरणी आणि डीजेच्या अतिवापराबाबत गणेश मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही मंडळांचे प्रत्येकी १ लाखांचे अनामत (डिपॉझिट) देखील जप्त करण्यात आले आहे. याबाबत गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेश महामंडळाने दिला आहे. याबाबत गणेश उत्सव महामंडळाची आज बैठक होणार असून त्यात आंदोलनातील पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे सार्वजनिक मंडळांसह सोसायटी व कॉलनीतील मंडळाचे प्रतिनिधी ही या बैठकीत सहभागी होणार आहेत. यंदा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत मिरवणुका काढण्यात आल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. मात्र मिरवणुकीनंतर मंडळांवर गुन्हे दाखल झाल्याने या मंडळांनी आता आवाज उठवण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या बैठकीला सार्वजनिक मंडळा सोबतच सोसायटी आणि कॉलनीतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना ही सहभागी करून घेतले जाणार आहे. असे नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी सांगितले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आल्याचे ते म्हणाले.
![]()












