• Latest
  • Trending
शास्त्रज्ञाला राज्यपालपद देतो म्हणत पाच कोटीना गंडा

शास्त्रज्ञाला राज्यपालपद देतो म्हणत पाच कोटीना गंडा

December 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

शास्त्रज्ञाला राज्यपालपद देतो म्हणत पाच कोटीना गंडा

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

नाशिकरोड परिसरातून संशयित गजाआड

नाशिक : छोटे मोठे भामटे आणि त्यांनी गंडवलेल्या घटना आपण नेहमी ऐकत असतो त्याच बरोबर सायबर गुन्हेगारी मुळे देखील हजारो नागरिकांचे खाते रिकामे होत लाखो रुपयांना चुना लावण्यात आलेला असतानाच नाशिक शहरातील एका भामट्याने चक्क तामिळनायडूच्या शास्त्रज्ञाची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक वर्षांपूर्वी निरंजन सुरेश कुलकर्णी (रा.40 गंधर्व नगरी मोटवानी रोड) याने आपली ओळख राजकीय नेत्यांसोबत असल्याचे सांगत चेन्नई जिल्हातील रहिवासी व शास्त्रज्ञ म्हणून परिचित असलेले नरसिम्हा रेड्डी दामोदर रेड्डी यांना तुम्हाला राज्यपाल पद मिळवून देतो असे सांगून सर्व्हिस चार्ज म्हणून पंधरा कोटींची मागणी करत पाच कोटी रुपयांची रोकड घेतली यासाठी नाशकातील हॉटेलमध्ये रेड्डी यांची भेट घेण्यात आली होती.मुख्य म्हणजे एका मित्रामार्फत नाशिकमध्ये एका कार्यक्रमात रेड्डी यांची ओळख कुलकर्णी सोबत झाली होती. दरम्यान 7 फेब्रुवारी 2024 रोजी त्याने पुन्हा नरसिम्हा यांची भेट घेत बनावट कागदपत्र दाखविली नरसिम्हा व त्यांच्या नातेवाईकांकडून रोख 60 लाख रुपये व 4 कोटी 48 लाख 99 हजार 876 रुपये बँक खात्यात वर्ग करून घेतले. दोन महिन्यात ही रक्कम त्याने उकळल्याचे रेड्डी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेने आपले जाळे टाकत तपास चक्रे वेगाने फिरविण्यास सुरवात केली असता तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने कुलकर्णी याचा माग काढण्यात आला त्यानंतर नाशिक रोड भागातील गंधर्व नगरी परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. निरंजन कुलकर्णी हा गंधर्व नगरी भागात मोटवानी रोडवरील श्री अपार्टमेंट मध्ये एका प्लॅटमध्ये राहतो त्याची पत्नी विभक्त असून आई-वडिलांसोबत या ठिकाणी तो वास्तव्यास आहे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. मात्र त्याच्या घरात काही विशेष आढळून आले नाही. नरसिम्हा यांचा विश्वास जिंकण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पात सुमारे 100 एकर जमीन शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचे निरंजन कुलकर्णी यांनी सांगितले या जमिनीच्या व्यवहाराबाबतचे भारत सरकारची मोहर असलेली बनावट कागदपत्रे दाखविली तसेच चांदशी गावात सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावावर जमीन असल्याचे भासून खोटे कागदपत्र दाखवून गंडविले. त्यानंतर मात्र रेड्डी यांनी फ्रियादीत म्हटले आहे की निरंजन कुलकर्णी याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. बारावी पास निरंजन ला मोठी लाईफ स्टाइल जगण्याचा शोक असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर फिर्यादी नरसिम्हा दक्षिण भारतात वैज्ञानिक म्हणून काम करतात.

Loading

Previous Post

इडलीच्या हातगाडीला लाथ मारली म्हणून केले ठार

Next Post

गावठी कट्टा बाळगणारा गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White