नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कारवाई

नाशिकरोड : पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयीत इसम हा पिस्टल सारखे हत्यार घेवुन पंपींग स्टेशन चेहडी जवळ, दारणा नदिवरील बंधा-यावर, चेहडी येथे येणार असल्याची गुप्त बातमी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाचे पोलिस अंमलदार विशाल कुवर व समाधान वाजे यांना मिळाली होती. त्या नुसार पंपींग स्टेशन चेहडी जवळ, दारणा नदिवरील बंधा-यावर, चेहडी येथील परिसरात सापळा रचण्यात आला होता.
सदर ठिकाणी एका संशयीतास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता. तो पळून जात असतांना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफिने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता. प्रशांत विनोदसिंग बाईयस (वय २६ वर्षे, रा. चेहठी पंपींग निवारा परकुल, नाशिकरोड)असे कळाले यावेळी त्याची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्टल (कटटा) मॅग्झीन सह ५०० रूपये किंमतचे जिवंत काडतुस असा एकुण २५,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, बडेताब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अरूण सावंत, जगताप, प्रविण सुर्यवंशी, संदिप पवार तसेच गुन्हेशोध पथकाचे टेमगर, गोसावी, नाना पानसरे, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे. रोहित शिंदे, सागर आडणे, महेद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे आदिनी केली आहे.
![]()












