• Latest
  • Trending
वाढती गुन्हेगारी वेळीच ठेचा अन्यथा….

वाढती गुन्हेगारी वेळीच ठेचा अन्यथा….

March 24, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

वाढती गुन्हेगारी वेळीच ठेचा अन्यथा….

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

गेल्या तीन महिन्यात शहरात दहा खून

नाशिक : शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. होळी, रंगपंचमी सारख्या सणांना देखील गालबोट लागले असून यादिवशी देखील खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. होळीच्या दिवशी नागरिक व्यस्त असतानाच सिडकोत ऐन संध्याकाळी भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार करत टोळक्याने पलायन केले होते तर रंगपंचमीच्या रात्री शहरात असलेल्या आंबेडकरवाडीत उमेश उर्फ मन्ना आणि प्रशांत जाधव या दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली. मुख्य म्हणजे यातील मयत उमेश जाधव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष होते. राजकीय, सामाजिक वर्चस्वादातून निर्घृण हत्या करण्यात आली .मुख्य म्हणजे सिडको व आंबेडकरवाडी येथील हत्येमध्ये सर्रास कोयते, चॉपर सारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. तर दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात (ठक्कर बाजार) किरकोळ कारणातून एकाने पेट्रोलची पिशवी “हॅपी होली” म्हणत एका व्यक्तीच्या अंगावर फेकून लायटरद्वारे पेटून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो व्यक्ती 60 टक्के भाजला.म्हणजे मानसिकता किती विकृत होत चाललेली आहे. याठिकाणी देखील संबंधित संशयित बसस्थानकात फिरायचा, झोपायचा, मात्र त्याला कधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी का हटकले नाही ? म्हणजेच कुठलीतरी मोठी घटना होण्याची वाट बघत असतो का ?. या घटना घडत असताना चक्क अनेक गुन्हेगार हे राजकीय चादर ओढलेले दिसून येतात आता तर चक्क शहरात मोठमोठाले बॅनर वर या काही भाई, दादा, नाना यांचे फोटो झळकू लागले आहेत. आणि हेच तथाकथित भाई आजच्या तरुणांचे आयकॉन होत आहेत. हे विशेष मुख्य म्हणजे हे आता नेत्यांचे देखील आयकॉन होऊ पाहत आहे. वाढदिवस साजरा करताना रील बनव, तलवारीने केक काप, एखादा भाई जेल मधून सुटला की त्याची मिरवणूक काढ हे धंदे आजचे तरुण व उद्याचे होऊ पाहणारे नागरिक करत आहेत याठिकाणी नाशिक पोलिसांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांनी या घटनांना आळा घालत उदात्तीकरण करणाऱ्या तरुणांना जेलचा रस्ता दाखविला. काल तर मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस नाशकात असताना पाथर्डीफाटा येथे एका युवकावर पाच जणांच्या टोळक्याने धारदार
शस्त्राने कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. मुख्य म्हणजे याच परिसरात अनधिकृत हॉटेल कम बार रात्री सुरू असतात.दारू ,चिकन पार्सल आणा आणि मनसोक्त प्या त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते महत्वाचे म्हणजे हे सर्व इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या नाकाखाली हे धंदे चालतात आणि पोलिसांना याची माहिती नसते याचे आश्चर्य वाटते.तर काही दिवसांपूर्वी राजकीय झूल ओढलेले सावकार रोहित कुंडलवाल यांच्या अनेक घटना बाहेर येत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबर यांचे फोटो आहेत. या पिता-पुत्रांवर खंडणीखोरी, अवैध वसुली, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत ते अजूनही फरार आहेत. राजकीय पक्षांना प्रामाणिक कार्यकर्ते सोडून अश्या लोकांची गरज पडते म्हणजे राजकीय नेते यांना पोसतात का ? मत्र्यांबरोबर फोटो काढायचे आणि आपले किती वजन आहे हे दाखवत गुन्हेगारी करायची. अश्या लोकांना राजकीय पक्ष स्थान देतात तरी कसे यामुळे सामान्य नागरिकांचा राजकारणावरील विश्वास उडत चाललेला आहे. ड्रग्ज प्रकरणात देखील नाशिक हे नाव संपूर्ण भारतात पोहचले होते. यामध्ये या तस्करांमध्ये महिला देखील आढळल्या हे चिंताजनक असून काही दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरात कॅफे मध्ये पडद्याआडचे धंदे उघडकीस आले. हे प्रकरण आमदार उघडकीस आणतात मात्र पोलिसांना याची कानोकान माहिती नसते.आपले तरुण मुले-मुली बाहेर काय करतात, त्यांचे मित्र कोण याकडे देखील आई-वडिलांनी लक्ष दिले पाहिजे अन्यथा नंतर रडत बसण्याची वेळ येऊ नये इतकेच… धक्कादायक बाब म्हणजे नाशिक शहरात गेल्या तीन महिन्यांत दहा खून झाले आहेत .ही चिंतेची बाब असून नागरिक, राजकीय पक्ष यांच्यावर विचार करण्याची वेळ आली असून आज जर हे थांबवले नाही तर याची मोठी दीर्घकालीन किंमत सर्वानाच चुकवावी लागणार हे नक्कीच

Loading

Previous Post

परिसरातील वर्चस्वातून दोघा भावांना संपवल्याची चर्चा

Next Post

धक्कादायक, अखेर “त्या” कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White