• Latest
  • Trending
वाढती गुन्हेगारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या 

वाढती गुन्हेगारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या 

October 3, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

वाढती गुन्हेगारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या 

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

या बदल्यानंतर तरी गुन्हेगारी आटोक्यात येईल का?

नाशिक: शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस दलावर मोठ्याप्रमाणात टीका होऊ लागल्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी १२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. मात्र यामुळे गुन्हेगारी आटोक्यात येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. देशभरात तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि रोजच होणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीत वाढ, तरुणाईमध्ये ड्रग्जचे वाढते व्यसन, गाड्यांची तोडफोड, भररस्त्यात कोयत्याने वार, चौकाचौकात होणारे खून यामुळे नाशिक हे गुन्ह्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा सहभाग उजेडात आल्याने आता गुन्हेगार आणि राजकीय नेते व त्यांची मैत्री हा देखील चर्चेचा विषय झाला आहे. मात्र यामुळे नाशिकची देशभरात प्रतिमा गुन्हेगारीची झाली असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे .यादरम्यान सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या सूचना दिल्या असतानाच शहरातील भाजपच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर या आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची मागणी केली होती. त्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेने शहरात मोर्चा काढत वाढत्या गुन्हेगारी बाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी झाली होती.त्यानंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी १२ पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांची गंगापूर ठाण्यात, गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची अंबड, तसेच अंबडचे दुय्यम निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांची सातपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांची आडगाव, मुंबई नाकाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोटे यांची एमआयडीसी चुंचाळे, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांची विशेष शाखा, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक संजय भिसे यांची सायबर, एमआयडीसी चुंचाळेचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांची मुंबई नाका, इंदिरानगरच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची शहर वाहतूक शाखा एक , शहर वाहतूक शाखा एकचे वरिष्ठ निरीक्षक तुषार आढाव यांची सातपूर, शहर वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांची शहर वाहतूक शाखा द्वारका युनिट येथे बदली करण्यात आली आहे.

Loading

Previous Post

नाशकात तरुणाचा खून, 9 महिन्यात 43 खून

Next Post

नाशिकच्या सातपूर परिसरात गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White