पाण्यासाठी तळमळ असणारा नेता -मा नगरसेवक अरुण पवार

नाशिक : झपाट्याने विस्तारित होणाऱ्या नाशिक शहरातील पाणी प्रश्न नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार अँड राहुल ढिकले यांनी मार्गी लावला आहे .अधिवेशनात राहुल ढिकले यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2011 मधील जन-गणनेनुसार नाशिक शहराची लोकसंख्या साधारण १४ लाखांच्या घरात होती. मात्र गेल्या दहा वर्षात लोकसंख्येने २० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या गंगापूर धरण समूहातून दररोज 400 दशलक्ष लिटर आणि मुकणे धरणातून 125 असे एकूण सुमारे 525 दशलक्ष लिटर पाण्याचे वितरण केले जाते. अशा परिस्थितीमध्ये आमदार राहुल ढिकले यांनी 226 कोटींची अमृत-2 ही योजना आणल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याची माहिती प्रचारा दरम्यान माजी नगरसेवक अरुण पवार यांनी मतदारांना दिली आहे. म्हसरूळ शिवारात ढिकले यांच्या प्रचारादरम्यान अरुण पवार बोलत होते ते पुढे म्हणाले की गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातील पाणी शहरातील विविध भागात पोहोचवण्यासाठी सात जलशुद्धीकरण केंद्र आहेत सातपूर मधील शिवाजीनगर, पंचवटी, दिंडोरी रोड निलगिरी बाग, गांधीनगर ,नाशिक रोड बारा बंगला, आणि विल्होळी अशा सात ठिकाणच्या केंद्रांची एकूण 610 दशलक्ष इतके पाणी शुद्धीकरणाची क्षमता आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी 135 लिटर प्रत्येक दिवशी पाणी देणे बंधनकारक आहे. त्यासाठी पाणी गळतीही कमी करणे अपेक्षित आहे. महापालिका क्षेत्रातील अलेक जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठे आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना यावर कुठलेही काम केले गेले नव्हते. या सरकारच्या काळात आमदार राहुल ढिकले यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विचारणा केली होती. आमदार ढिकले यांची पाण्यासाठीची तळमळ बघता त्या वेळचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की नाशिक शहरातील 30 वर्षापूर्वीच्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्या बदलण्यात येतील नवीन वसाहतीतील जलवाहिनांसाठी 226 कोटी 34 लाख रुपयांचा पाणीपुरवठा योजनांचा सुधारित आराखडा केंद्र शासनाच्या अमृत-2 या योजनेसाठी राज्य वार्षिक कृती आराखड्यात घेतला जाईल हा प्रकल्प मंजूर झाल्यास शहरात नवीन जलवाहिन्यांचे जाळे अस्तित्वात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या अमृत-2 योजनेतून निधी मिळाल्यावर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 110 जलकुंभातून 2200 किमी पाईपलाईन द्वारे 2 लाख 300 घरांना पाणी दिले जाते. नवीन टाक्यांसाठी शासनाच्या अमृत योजनेतील महापालिकेने 342 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यास सुरुवात झाली आहे आचारसंहितेत हे काम अडकू नये म्हणून फास्ट ट्रॅक वर या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली यामुळे शहरातील 25 लाख नागरिक व 23 खेड्यांमधील सुमारे अडीच ते तीन लाख लोकांना या योजनेमुळे पुरेसा दाबाने पाणी पुरवठा मिळणार आहे

![]()












