• Latest
  • Trending
भुजबळ नाराज तर समर्थकांचा संताप

मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना…. 

December 18, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना…. 

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

रस्त्यावर लढाई लढायला तयार भुजबळांचा एल्गार

नाशिक : राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार आले त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र या मंत्रिमंडळातून अनेक दिगग्ज नेत्यांना डावलण्यात आल्याने नाराजीचे फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ‘दबंग” व जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली व आक्रमकपणे अजित पवार यांच्यावर टीका करत “जहां नहीं चैना, वहां नहीं रहना” म्हणत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची झोप उडवून दिली. यादरम्यान आज झालेल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरून लढाईला तयार असल्याचे विधान केले आहे.आता लढाई आमदार म्हणून लढणार. तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है असंही छगन भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले मी संपूर्ण राज्यात जाणार. एवढंच नाही तर अनेक राज्यांराज्यात जाणार. पुन्हा ओबीसीचा एल्गार करणार. दिल्लीत रामलिला मैदान भरवलेलं सगळ्यांनी बघितलं होतं. पाटणा, बिहारमध्ये पाऊस पडला तरी लोक बसले होते. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण यांच्या सभांच्या नंतर समता परिषदेची सभा इतकी मोठी झाली. पूर्ण मैदान भरलं होतं. काहींचं आपल्याबद्दल वेगळं मत निर्माण झालं आहे. त्यांना मी इतकंच सांगू इच्छितो, ‘मेरे बारे मे कोई राय मत बनाना गालिब.. एक ऐसा दौर आयेगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी.’ असाही शेर छगन भुजबळ यांनी म्हटला आहे.मंत्रिपद मिळालं नाही तर नाही मात्र अवहेलनचं शल्य मनात आहे. मी तुम्हा सगळ्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेणार. मै मौसम नहीं जो पल में बदल जाऊं, मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ, ऐसेही फेक न देना हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ”, असाही शेर छगन भुजबळ यांनी म्हटला. तसंच ते पुढे म्हणाले की प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही, ओबीसी समाजाचे प्रश्न निर्माण होतील तेव्हा संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? मंत्रिपद आलंही आणि गेलंही एवढंच काय विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केलं आहे, असेही भुजबळ म्हणाले.महायुतीच्या सरकारला ओबीसींची एकगट्टा मते मिळाल्याची आठवण भुजबळ यांनी या मेळाव्यात करुन दिली आहे. विधानसभेच्या निवडणूका झाल्या परंतू राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका अजून बाकी असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी आपले उपद्रव्य मूल्य दाखविण्यास सुरुवात केली आहे.

Loading

Previous Post

कसला वादा आणि कसला दादा भुजबळ संतापले

Next Post

5 कोटी दया,मग जागेवर या अन्यथा मुडदे पाडू…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White