आरोपींना मदत करणारे कोणीही असो सुटता कामा नये

नाशिक : कोलकाता, बदलापूर या ठिकाणी मुली, महिलांवर अत्याचार झाल्यानंतर देशाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे . त्यानंतर देखील अनेक भागांतून अश्या घटना समोर आल्या आहेत .विरोधी पक्षांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील जळगाव येथील लखपती दीदी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करत आरोपींना मदत करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे .यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे.दोषी कोणीही असू द्या त्याला सोडू नका.आरोपींना मदत करणारे वाचले नाही पाहिजेत.शाळा, रुग्णालये, पोलीस प्रशासन,कार्यालये कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. व याचा वरपर्यंत मेसेज जाऊ द्या .सरकार येईल, जाईल, पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवलीच पाहिजे. सर्व राज्य सरकार आणि राजकिय पक्षांना सांगतो महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचे सरकार कडक कायदे करत आहेत.आज इतक्या मोठ्या संख्येने महिला व मुली आल्या आहेत.पूर्वी तक्रारी यायच्या वेळेत एफआयआर, सुनावणी होत नाही,विलंब होतो अश्या अडचणी आम्ही भारतीय न्याय संहितेतुन दूर केल्या आहेत . नव्या कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची त्यावर शिक्षा होत नव्हती यावर आम्ही कायदे केले आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार हे महिलांच्या व राज्य सरकारच्या सोबत आहे .असेही पंतप्रधान मोदी म्हणाले .

![]()











