• Latest
  • Trending
कुंभमेळा निमित्ताने राजकीय नेते,अधिकारी यांना चाप लावण्याची तयारी सुरू

महाकुंभ तोंडावर असताना असे रिलॅक्स राहून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. 

August 7, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

महाकुंभ तोंडावर असताना असे रिलॅक्स राहून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन कामांची प्रगती तपासली जाणार 

नाशिक  :   शहरातील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची आज तातडीची आढावा बैठक घेतली. नाशिक-त्र्यंबकेश्वर  महासिंहस्थ कुंभ जवळ आला असून, या पार्श्वभूमीवर विकासकामे सुरु आहेत. मात्र, यामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक अपघातही घडले आहेत. वाढत्या अपघातांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा २०२७’ च्या पूर्वतयारीचा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला.  फडणवीस म्हणाले, “शहरात इतका मोठा निधी खर्च करून विकासकामे होत असताना, नागरिकांकडून जर प्रशासनाविरोधात रोष येत असेल, तर आपण कुठे चुकतो आहोत याचे आत्मपरीक्षण अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या यंत्रणांवर आणि कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा, त्यांचे पुढील काम थांबवा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच अधिकाऱ्यांनी चेंबरमध्ये बसून न राहता फिल्डवर जाऊन काम करावे आणि मल्टिपल एजन्सीजशी संवाद ठेवावा, असेही त्यांनी सुनावले. पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल आणि त्या वेळी कामात गुणात्मक सुधारणा दिसली नाही, तर गंभीर कारवाईला  सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला. असे रिलॅक्स राहून चालणार नाही. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 10 ते 12 कोटी भाविक येण्याची शक्यता  या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी विकासकामांना अधिक गती देण्याच्या आणि गुणवत्तेबाबत सूचना दिल्या आहेत. यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १० ते १२ कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुंभमेळ्यासाठी जवळपास ४० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याने प्रत्येक काम वेळेत आणि दर्जेदार होणे बंधनकारक आहे,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

शहरातील आऊटर रिंगरोड हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याच्या अंमलबजावणीतील कंत्राटदारांच्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे नाशिकच्या नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती मान्य करत त्यांनी प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. मात्र, पावसाच्या काळातही सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ते वाहतूकयोग्य (मोटरेबल) करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. तसेच कुंभमेळ्याच्या नियोजनात शहरात अधिक हरित क्षेत्र (ग्रीन झोन) निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading

Previous Post

खड्ड्यांमुळे मृत्यू राहिले बाजूला खेळ रंगला पालकमंत्री पदाचा

Next Post

ठाकरे गटाचे व्हीलचेअरवर तर राष्ट्रवादीचे नगरसेवक रुग्णवाहिकेतून महापालिकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White