• Latest
  • Trending
“मनसे” चे इंजिन आता ड्रायव्हरविना !

“मनसे” चे इंजिन आता ड्रायव्हरविना !

December 26, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“मनसे” चे इंजिन आता ड्रायव्हरविना !

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष करणारे दिनकर पाटील मनसेतून निलंबित

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी अचानक भाजप प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची नियोजन करताना आणि बुधवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीचा निर्णय झाल्यानंतर नाशिक येथील मनसे कार्यालयात जल्लोष करणारे पेढे वाटणारे दिनकर पाटील यांनी रात्रीतून आपली निष्ठा बदलत हाती कमळ घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मुख्य म्हणजे आत्ता होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनकर पाटील यांच्या राजकीय वजनावर आणि शब्दावर अवलंबून असलेल्या इच्छुक उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून मनसेकडून तिकीट मिळेल या अपेक्षेने तयारी करणारे अनेक इच्छुक आता मात्र संभ्रमात सापडले आहेत त्यामुळे मनसेतून इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आता आपले काय ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी आधीच प्रचाराची सुरुवात केली होती. तर काहींनी आर्थिक तयारी करून ठेवली होती. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षांचा विचार न केलेला इच्छुकांची अवस्था मात्र आता कठीण झाली आहे. दिनकर पाटील हे मनसे संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारी मानले जात होते संघटना बांधणी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि नेतृत्वाशी असलेली जवळी यामुळे अनेक इच्छुक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते. मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिनकर पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करीत उमेदवारीसाठी मनसेत प्रवेश केला होता. मनसेने तात्काळ त्यांना उमेदवारी दिली. परंतु पाटील पराभूत झाले त्यानंतर नाशिक मधील महत्त्वाचे पद पाटील यांना दिले गेले. पक्षाचे सर्व निर्णय पाटील यांच्याकडे होते. पक्षाचे सर्व धुरा आपल्या हाती घेतली होती मात्र त्यांनी अचानक मनसेला धक्का देत भाजपात प्रवेश केल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. दिनकर पाटील मनसेतून निलंबित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांना पक्षातून निलंबित केले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून याबाबतचा अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की दिनकर पाटील यांच्याशी यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही संबंध राहणार नाही. पक्षाच्या धोरणांना आणि संघटनात्मक शिस्तीला बाधा पोहोचविणाऱ्या कृतीमुळे ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे मनसे कडून सांगण्यात आले आहे

Loading

Previous Post

इतर पक्षांना धक्का देणाऱ्या भाजपमध्येच “रामायण”

Next Post

नाशकात महायुती होणारच ? इच्छुक टेन्शनमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White