नाशिक भाजपात मोठा राडा! घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा संताप

नाशिक : ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे,माजी महापौर यतीन वाघ, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील,शरद पवार गटाचे नितीन भोसले यांचा आज भाजपात झाला मात्र, त्यावरून भाजपात मोठ्याप्रमाणात असंतोष उफाळून आला आहे. नाशिकमध्ये आज होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे भाजपा आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला आहे. “प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. मी निवडणूक प्रमुख असून सुद्धा मला पक्षप्रवेशाबाबतब कुठलीही विचारना करण्यात आली नाही,” अशी सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार देवयानी फरांदे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. देवयानी फरांदे यांच्या विरोधाने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या वादावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांचा संताप आणि मंत्री गिरीश महाजन यांना घेराव गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भाजपामध्ये काम करत आहोत. ऐन निवडणुकीच्यावेळी आमच्या प्रभागात दुसऱ्या पक्षातील नेत्यांना घेऊन त्यांना उमेदवारी दिली जात असल्याने आम्ही नाराज आहोत. याला आमच्या तीव्र विरोध आहे. आम्ही सर्व आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठीशी आहोत. आम्ही फक्त सतरंज्या उचलायला आहोत का?,” असं भाजपाच्या इच्छुक उमेदवार म्हणत आहेत.भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. बाहेरच्या नेत्यांना प्रवेश नकोच अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. दरम्यान, याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

![]()












