नाशिक पूर्व मतदारसंघासाठी प्रसाद सानप तर देवळाली साठी मोहिनी जाधव

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी जाहीर केली असून यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 32 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. याआधी नाशिक पश्चिम मतदारसंघासाठी भाजप मधून मनसेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती

तर आज महाविकास आघाडी व महायुती साठी महत्वाचा असलेल्या मध्य मतदारसंघात मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष अंकुश अरुण पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून नाशिक पूर्व मतदारसंघासाठी प्रसाद दत्तात्रय सानप यांना तर देवळाली मतदारसंघातून मोहिनी गोकुळ जाधव यांना उमेदवारी देण्यात आली असून यामुळे महायुती महाविकास आघाडी समोर मनसेचे आव्हान असणार आहे.



![]()












