• Latest
  • Trending
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिकमध्ये पुन्हा एकदा भोंदूबाबाचा पर्दाफाश

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण हे देशभर चर्चेत आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमध्ये भोंदू खरातच्या जेल वाऱ्या सुरू असताना नाशिकमध्ये आणखी भोंदूबाबा समोर आला असून आश्रम आणि मठ स्थापन करून, विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांचे शोषण करणाऱ्या कमलेश शिवकुमार अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन पीडित भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये अवघ्या एका महिन्याच्या अंतराने निधन झाले होते. या अचानक झालेल्या मृत्यूमुळे दोन्ही भाऊ प्रचंड मानसिक दडपणाखाली आणि भीतीच्या छायेत जगत होते. यावर काहीतरी आध्यात्मिक किंवा दैवी तोडगा मिळावा म्हणून त्यांनी शोध सुरू केला. यादरम्यान त्यांना यूट्यूबवर(नाथ भक्ति व त्रिकाल रहस्य या चायनल द्वारे) नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली. दोन्ही भावांनी नाशिक गाठून कमलेश अधिकारीची भेट घेतली. याचा फायदा घेत भोंदूबाबानं त्यांच्या मनाचा ताबा मिळवला. “तुमच्या कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे, तुम्ही राहत असलेल्या जमिनीत दैवी दोष आहे. तिथे गुप्तधनाचा साठा असून अतृप्त आत्म्यांनीच तुमच्या आई-वडिलांचा बळी घेतला आहे. आता तुम्हा दोघांवरही मृत्यूयोग आहे,” अशी भीती त्याने देवकर बंधूंना दाखवली. यानंतर भोंदूबाबानं त्यांना मध्यप्रदेशातील उज्जैन येथे बोलावून घेतले. तिथल्या स्मशानभूमीत जळत्या चितेवर चार दिवस अघोरी पूजा करण्यात आली. या पूजेदरम्यान पशूंचा बळी देण्यात आला आणि या नावाखाली 1 लाख 50 हजार रुपये उकळले. त्यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा करून प्राण्यांचा बळी देण्यात आला आणि पीडितांना दारू प्रसाद म्हणून देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता या भोंदूबाबानं दोन्ही भावांना त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात बळजबरीने डांबून ठेवले. त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेत त्यांचे विविध प्रकारे शोषण केले. तसेच स्वतःचा मठ बांधण्याच्या बहाण्याने त्यांची दोन एकर शेतजमीन फसवणूक करून परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली. या संपूर्ण गुन्ह्यात भोंदूबाबा कमलेश अधिकारी याला त्याची पत्नी देखील मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. फिर्यादीनुसार दोन्ही भावांचे मोबाईल काढून घेण्यात आले बाहेरील संपर्क तोडण्यात आला तसेच पोलिसात तक्रार करण्यापासून परावृत्त करण्यात आली काही काळ त्यांना विविध आश्रमात नजर कैदेसारख्या परिस्थिती ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे जुलै 2025 मध्ये मदन देवकर हे तेथून पळून गावी परतले तर जानेवारी 2026 मध्ये त्यांनी भावालाही आश्रमातून बाहेर काढले अघोरी पूजा व जादूटोण्याचे व्हिडिओ आणि फोटो असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. या जाचाला कंटाळून सोलापूरच्या या दोन पीडित भावांनी नाशिक येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पीडितांना धीर देत इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी भोंदू कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नी गौरी अधिकारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहेत. या भोंदूबाबानं अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी थेट अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

Previous Post

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

Next Post

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White