• Latest
  • Trending
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

सातपूर परिसरातील कुख्यात टोळीला बेकायदेशीर मदतीसाठी ही पार्टी

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीसोबत (तोतया IPS अधिकारी गौरव मिश्रा) दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय निवासस्थानाजवळ रंगलेल्या या मद्य पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत 3 तुरुंग अधिकाऱ्यांना  कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची गंभीर दखल घेत मध्यवर्ती कारागृह  वरिष्ठ पातळीवर तपास करून आपला प्राथमिक अहवाल  वरिष्ठांना सादर केला आहे. यामध्ये 1. हिरालाल भामरे ( तुरुंगअधिकारी) 2. जगदीश ढुमणे ( तुरुंगअधिकारी) 3. अशोक मलवाड ( तुरुंगअधिकारी)

या तिन्ही अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा थेट ठपका ठेवण्यात आला आहे. हे तिन्ही अधिकारी 2014 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कार्यरत आहेत. प्रशासनाने या तिघांनाही नोटीस बजावून 7 दिवसांच्या आत  लेखी खुलासा  सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत. कोण आहे ‘तो’ संशयित आरोपी? नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तीन वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांसोबत दारू पार्टी  करणाऱ्या संशयित आरोपीबाबत आता अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओमध्ये दिसणारा संशयित गौरव मिश्रा हा साधासुधा आरोपी नसून, तो चक्क ‘तोतया अधिकारी’ बनून लोकांना गंडा घालणारा सराईत गुन्हेगार  असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधील  सातपूर परिसरातील कुख्यात असलेल्या टोळीला कारागृहात बेकायदेशीर मदत मिळवून देण्यासाठीच ही पार्टी आयोजित करण्यात आल्याची चर्चा आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार गौरव मिश्रा हा चक्क लाल दिव्याची गाडी घेऊन फिरायचा. तो स्वतः मोठा शासकीय अधिकारी असल्याचे भासवत नाशिक पोलीस आयुक्तालयातील  अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आपली छाप पाडायचा. तोतया अधिकारी बनून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी 2024 मध्ये नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात  त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर 21 नोव्हेंबर 2024 रोजी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. प्रकरणाला आता नवीन राजकीय आणि गुन्हेगारी वळण मिळाले आहे. नाशिकमधील  सातपूर  परिसरातील कुख्यात  टोळीतील काही गुंड सध्या नाशिक जेलमध्ये बंदिस्त आहेत. या टोळीला कारागृहात विविध सुविधा आणि मदत मिळवून देण्यासाठीच गौरव मिश्रा याने मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांशी संधान साधल्याची चर्चा आहे.

https://youtube.com/shorts/uCvXvhYvDZM?si=BktCbBiMnokgFRyP

Loading

Previous Post

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

Next Post

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White