• Latest
  • Trending
भुजबळांच्या शुभेच्छा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा संताप !

भुजबळांच्या शुभेच्छा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा संताप !

October 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भुजबळांच्या शुभेच्छा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा संताप !

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नांदगाव मतदारसंघामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

नाशिक- गेल्या काही दिवसांपासून नांदगाव मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळ यांचा वावर वाढला असून या ठिकाणी समीर भुजबळ यांनी अनेक कार्यक्रम राबविण्यास सुरवात केल्याने राजकारणात याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असतानाच आज समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सोशल मीडियात दिलेल्या शुभेच्छा पोस्टमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात सध्या सुहास कांदे हे आमदार आहेत पक्ष फुटीनंतर कांदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने देखील सत्तेत सामील होत महायुतीत येणे पसंत केले सध्या महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी गट असताना व नांदगाव मतदार संघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे असताना अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करतात आणि सत्तेत असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून माजी खासदार भुजबळ यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा घडो आणि नाशिक प्रमाणेच नांदगाव मतदार संघाचा देखील समीर भुजबळ यांच्याकडून विकास घडो, अशा शुभेच्छा दिल्या यामुळे शिंदे गट आक्रमक झाला असून मंत्री छगन भुजबळ यांनी समीर यांना शुभेच्छा देणे म्हणजे एकप्रकारे समीर भुजबळ यांच्या उमेदवारीचे अप्रत्यक्ष संकेत देण्यासारखेच आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली असून नांदगावमध्ये आमचे विद्यमान आमदार सुहास कांदे आहेत, त्यामुळे ही जागा शिवसेनेकडेच राहणार. आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर उचित होणार का? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी भुजबळांना विचारला आहे. मात्र त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे गट व अजित पवार गट आमने-सामने येण्याची शक्यता असून यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची युती असताना नांदगाव मतदारसंघातून पंकज भुजबळ यांनी उमेदवारी केली होती ते या मतदारसंघात दोनदा आमदार राहिले आहेत. गत निवडणुकीत त्यावेळी ठाकरे गटात असलेले सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता. मात्र आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांना प्रचारापासून पक्षाने लांब ठेवल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती याचा परिणाम लोकसभेत होऊन लोकसभेतील शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले होते अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात अथवा नांदगाव मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी समीर भुजबळ हे राष्ट्रवादीतुन बंडखोरी करतात अथवा दुसऱ्या पक्षाकडून म्हणजेच शरद पवारांच्या तुतारी कडून निवडणूक लढवतात अथवा अपक्ष उमेदवारी करतात याकडे राजकिय तज्ञांचे लक्ष लागून आहे

Loading

Previous Post

देवळाली मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास -आ सरोज आहिरे

Next Post

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White