• Latest
  • Trending
भारताचे उपकार विसरलेला तुर्की….

भारताचे उपकार विसरलेला तुर्की….

May 15, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भारताचे उपकार विसरलेला तुर्की….

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

कहते हैं दुश्मन का दोस्त भी दुश्मन ही होता है

वृत्तसंस्था : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत. धर्म विचारून निष्पाप पर्यटकांना मारण्यात आले. यामुळे भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर संतापलेल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबविले यावेळी अनेक मोठ्या आणि ताकदवान देशांनी भारताला पाठींबा दिला तर चीन, तुर्की, आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानचे समर्थन केले. यामुळे या देशांविषयी भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. मुख्य म्हणजे ऑपरेशन सिंधुर सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी एक तुर्की जहाज पाकच्या कराचीत पोहचले. या जहाजात तुर्की सोंगर ड्रोन होते अशी चर्चा होती यादरम्यान यादरम्यान, पाकिस्तानने तुर्कीयेने पुरवलेल्या ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला.वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये एकूण ३५० हून अधिक तुर्की ड्रोनचा वापर करण्यात आला. पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेले तुर्की लष्करी कर्मचारी भारताविरुद्ध ड्रोन हल्ल्यांमध्ये सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.ऑपरेशन सिंदूर’नंतर, तुर्की सल्लागारांनी पाकिस्तानी सैन्याला भारतावर ड्रोन हल्ले करण्यात मदत केली होती. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत दोन तुर्की ड्रोन ऑपरेटर देखील मारले गेल्याचे माहिती समोर आली आहे. याच तुर्कीला मित्र समजून भारताने अत्यंत अवघड क्षणी मदत केल्याचा हा गद्दार तुर्की विसरल्याचे दिसते.६ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कीमध्ये एक विनाशकारी भूकंप झाला होता ज्यामध्ये ५५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपानंतर लगेचच तुर्कीयेला मानवतावादी मदत पाठवण्याची घोषणा केली होती. तुर्कीला मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त‘ सुरू केले.भारताने तुर्कियेला मदत करण्यासाठी सुरू केलेले हे ऑपरेशन होते. या अंतर्गत, NDRF (National Disaster Response Force) आणि सैन्य दलाच्या टीम्स तुर्कियेमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी पाठविण्यात आल्या. ज्या अंतर्गत तुर्कीयेला भारताने वैद्यकीय साहित्य, अन्न आणि इतर आवश्यक वस्तू पाठवून मदत केली.
तुर्कीयेमध्ये भारताची कारवाई १० दिवस चालली होती. भारताने पाठवलेल्या (अन्न) मिठाला हा देश जागला नाही. त्यावेळी याच पाकिस्तानने साधी सुई देखील या देशाला पाठवली नव्हती. त्यामुळे भारतीय नागरिकांनी या देशांच्या विरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून या पुढे तुर्की कडून सफरचंद खरेदी न करण्याचा निर्णय देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने घेतला आहे. भारत दरवर्षी तुर्कीमधून 1.30 मेट्रिक टन सफरचंद आयात करतो त्याचबरोबर तुर्कीहुन येणारे सफरचंद पुण्यात तीन महिने विकले जातात या काळात त्यांची उलाढाल 1200 ते 1500 कोटी रुपयांची होते मात्र हा मोठा फटका तुर्कीला बसणार आहे. भारतीय पर्यटकांकडून मिळणाऱ्या मोठ्या उत्पन्नामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था चालते. दरवर्षी 3 लाख भारतीय पर्यटक तुर्कीला जातात मात्र तुर्की आणि अझरबैझानवर पर्यटकांनी दोन्ही देशांवर बहिष्कार टाकण्यास सुरवात केल्याने या देशांच्या बुकिंगमध्ये 60 टक्के घट झाली आहे. याशिवाय आधी बुकिंग केलेले तिकीटे रद्द केली जात आहेत.

यामुळे या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. यावर सोशल मीडियात देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे.भारतीय नागरिक म्हणतात भारतीयांनी गेल्या वर्षी या देशांना ४,००० कोटी रुपये दिले. आम्ही त्यांच्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा दिला, पण आज ते आमच्या शत्रूसोबत उभे आहेत. भारतात आणि जगात अनेक सुंदर ठिकाणे आहेत… या दोन्ही ठिकाणांना सोडून द्या. जय हिंद तर दुसरीकडे तरुणांमध्ये या देशांविषयी भयंकर संताप दिसत असून ते सोशल मीडियावर लिहताना, या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची मोठी भूमिका आहे. तुर्कीच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा १२% आहे आणि तो १०% लोकांना रोजगार देतो. तर, ते अझरबैजानच्या जीडीपीमध्ये ७.६% योगदान देते आणि १०% रोजगार प्रदान करते.

हे देश पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देतात, तेव्हा आपण त्यांच्या पर्यटनाला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी का?

Loading

Previous Post

लग्नाचं स्टेटस आणि मैत्रिणीने केला घात

Next Post

तर महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई- आ. फरांदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White