• Latest
  • Trending
फिजिक्सवाला प्रकरण आणि नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

फिजिक्सवाला प्रकरण आणि नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 13, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

फिजिक्सवाला प्रकरण आणि नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक : शहरात खाजगी कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘फिजिक्सवाला’ कोचिंग क्लासमध्ये गोंधळ घातला होता. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात मनसेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये घडली. या क्लासमध्ये बहुसंख्य विद्यार्थी मराठी भाषिक असून त्यांची मातृभाषा मराठी आहे. मात्र क्लासमधील बहुतांश शिक्षक हे परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांना हिंदी समजण्यात अडचणी येत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याची तक्रार मनविसेकडून करण्यात आली.

याबाबत मनसेचा आरोप आहे की, एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना “मराठीत शिकवणार नाही, शिकायचं असेल तर हिंदीतच शिका” अशी अरेरावी केली. यासोबतच मराठी भाषेला गावठी म्हणून हिनवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई, बाजीराव मते, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे, शहर संघटक अक्षय कोंबडे, विभाग अध्यक्ष रोहित उगावकर यांच्यासह काही कार्यकर्ते थेट क्लासमध्ये दाखल झाले.मनसे पदाधिकाऱ्यांनी क्लास व्यवस्थापनाला जाब विचारत शिक्षकांची यादी मागितली. ‘पांडे’ नावाच्या शिक्षकाला हजर करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे, धमक्या देणे, मराठीत बोलण्यास मज्जाव करणे, या मुद्द्यांवरून व्यवस्थापनाला धारेवर धरण्यात आले. याच वादात मराठी बोलण्यास विरोध करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या गोंधळामुळे क्लासमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.तसेच, क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे सात दिवसांत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा क्लासची तोडफोड करून पुन्हा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार मारहाण, धमकी आणि गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली मनसेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत असून, या घटनेमुळे नाशिकमधील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

Loading

Previous Post

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

Next Post

नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White