बंडाचा अध्याय दुसरा, उमेदवारी कोणालाही दया पण हिरेंना नको

नाशिक : शहरातील पश्चिम मतदार संघात भाजपाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असत विद्यमान आमदार सीमा हिरे यांना स्वकीयांचाच विरोधाचा सामना रोज करावा लागत आहे .काल सातपूर येथे पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकित दिनकर पाटील, मुकेश शहाणे, धनंजय बेळे, शशिकांत जाधव, कैलास आहेर, विक्रम नागरे, जगन पाटील, दिलीप भामरे आदींनी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवारास उमेदवारी दयावी अन्यथा काम न करण्याचा इशारा प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांना दिला होता मात्र हे प्रकरण या ठिकाणी न थांबता भाजपातील इच्छुक उमेदवारांनी हिरे यांच्या विरोधातील मोहीम कायम ठेवली असून सर्व इच्छुकांनी भाजपाचे नाशिक येथील कार्यालय असलेल्या वसंत स्मृती ला धडक देत भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासमोर आमदार सीमा हिरे यांच्यावर गंभीर आरोप करत निवडून येईल असाच उमेदवार देण्याची मागणी केली .गेल्या 10 वर्षात विद्यमान आमदारांनी कुठलेही काम केले नसल्याचा आरोप इच्छुक उमेदवारांनी पुन्हा एकदा केला. येत्या काही दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटण्यासाठी इच्छुक उमेदवार जाणार असल्याची माहिती मिळत असून यावेळी विद्यमान आमदारांना स्वकीयांचाच विरोध असल्याने भाजपाच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे .त्यामुळे बंडखोरांना पक्ष शांत बसवतो की उमेदवारच बदलतो. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

![]()











