शहर आणि जिल्ह्याचा कारभार एकाच कुटूंबाच्या हातात

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदी वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाली यामुळे महापालिका वर्तुळ आणि शहरात समाधानाचे वातावरण असतानाच काही तासातच या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आणि नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची निवड करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, संकटमोचक, मंत्रीमहोदय यांची नाराजी राहुल कर्डीले यांना भोवल्याची चर्चा आहे.मनीषा खत्री या सध्या नाशिक प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रमुख होत्या. मात्र आज त्यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली . मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या पत्नी आहेत. पती जिल्हाधिकारी आणि पत्नी नाशिक महापालिका आयुक्त असल्याने शहर व जिल्ह्याचा कारभार एकाच घरातून हाकला जाणार आहे.आगामी सिहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

![]()












