• Latest
  • Trending
नाशिक हिंसाचाराचं “राजकीय” कनेक्शन

नाशिक हिंसाचाराचं “राजकीय” कनेक्शन

April 18, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक हिंसाचाराचं “राजकीय” कनेक्शन

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

हल्ला पूर्वनियोजितच असल्याचा पोलिसांना संशय

नाशिक : शहरातील काठे गल्ली सिग्नल ते पखाल रोड परिसरात रात्री 1 वाजेच्या दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करत तुफान दगडफेक केली होती. या झालेल्या दगडफेकीत  21पोलिस जखमी झाले होते. आता या घटनेवर प्रकाश पडत असून यातून मोठी माहिती समोर आली आहे .या झालेल्या हिंसाचारातील राजकीय कनेक्शन समोर येत असून जमावाला चिथावणी देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे समोर आल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री पोलिसांवर झालेली दगडफेक म्हणजे पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेकडून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पखालरोड परिसरातील दर्ग्याचे बांधकाम काढण्यात येणार होते. यासाठी पोलीस बंदोबस्ताची तयारी करत असताना पखालरोडच्या दिशेने अचानक मोठा जमाव जमला यावेळी पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जमावाने न ऐकता पोलिसांवर तुफान दगडफेक सुरू केली. यादरम्यान वीजपुरवठा खंडित करून परिसरातील इमारतीच्या टेरेसवरून दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे त्याचबरोबर हल्लेखोरांच्या 97 दुचाकी पोलिसांना मिळून आल्या असून यामध्ये नाशिकबरोबरच मालेगाव, धुळे येथील पासिंग असलेल्या गाड्या पोलिसांना मिळून आल्याने हल्ला पूर्वनियोजित कट असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी 57 जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये वडाळा गावातील गुलशन नगर, पंचशील नगर, द्वारका नगरी, खडकाळी, पखालरोड, अशोका मार्ग, वडाळा रोड, चिराग शाह कॉलनी, बागवानपुरा, मनोहर मार्केट सारडा सर्कल, मातोश्री कॉलनी, वडाळ्यातील मदिना नगर,भारत नगर या परिसरात राहणाऱ्या संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट आणि चिथावणी देऊन हल्ला— पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचे राजकीय कनेक्शन आता समोर येऊ लागले असून यामध्ये  प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे शेख हनिफ बशीर,दाऊद शेख, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आरीफ हाजी पटेल शेख,फईम शेख, यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.यांनी सोशल मीडियाद्वारे भारताचे सार्वभौमत्व एकात्मता आणि अखंडत्व धोक्यात आणण्याच्या उद्देशाने जमावाला चिथावणी दिल्याची माहिती पुढे आली आहे. या कलमांखाली गुन्हे….भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या 40 ते 45  कलमांनुसार संशयितांवर मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सुमारे दीड हजार जण या हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती मिळत असून त्यापैकी 57 जणांची ओळख पटली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कर्तव्य करण्यापासून रोखणे, जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाने हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दगडफेक करत बेकायदेशीर जमावाचा भाग होणे, पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणे. पोलिसांच्या प्रकृतीत सुधारणा…..पोलिसांवर वीजपुरवठा खंडित करून तुफान दगडफेक सुरू असताना देखील पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अर्ध्या तासात परिस्थितीवर नियंत्रण मिळविले याबद्दल सर्वच स्थरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. जखमी पोलिसांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Loading

Previous Post

जखमी पोलिसांची आ. फरांदे यांनी घेतली भेट

Next Post

प्रियकराला मिठी आणि आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White