नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित ?

नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे, छगन भुजबळांच्या नावाची चर्चा वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असून शिंदे, फडणवीस,अजित पवारशी दिल्लीतुन चर्चा सुरू असल्याचे कळते. देशपातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी छगन भुजबळ यांचा फायदा करून घेता येईल का याची चाचपणी भाजपा व मित्र पक्षांकडून केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर नाशिकच्या जागेसाठी भाजपा व शिवसेना शिंदे गटाची रस्सीखेच सुरू असल्याने ही जागा राष्ट्रवादीला म्हणजेच पर्यायाने छगन भुजबळ यांना सोडण्यात यावी असा देखील मतप्रवाह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
![]()











