• Latest
  • Trending

नाशिक लोकसभेची अडथळ्यांची शर्यत जिंकणार कोण ?

May 19, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक लोकसभेची अडथळ्यांची शर्यत जिंकणार कोण ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

शांतीगिरी महाराजांमुळे होणारी मतविभागणी विजयाचे गणित ठरवणार का ?

नासिक: लोकसभेची निवडणूक अनेक कारणांनी महाराष्ट्रभरात चर्चेत राहिली. नाशिक जिल्ह्यात महाआघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळविणाऱ्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यातच स्वामी शांतिगिरी महाराजांनी रिंगणात उडी घेतल्याने हिंदुत्ववादी मतांची होणारी मत विभागणी महायुतीला अडचणीची ठरू शकते का? अथवा वंचित आघाडीकडून करण गायकर यांना मिळालेली उमेदवारी महाआघाडीला अडचणीत आणू शकते का ? हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल. महाविकास आघाडीने म्हणजेच ठाकरे गटाने ऐनवेळी विजय करंजकर यांचा पत्ता कट करत त्या ठिकाणी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. मात्र महायुतीत सव्वा महिने घोळ सुरू होता भाजपचे नेते अमित शहा यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारीसाठी राजी केले मात्र नंतर त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांच्या समर्थकांची नाराजी कायम दिसली. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे ग्रामीण भागातील नेतृत्व असून त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे मुख्य म्हणजे ठाकरेंना मिळणारी सहानुभूती देखील त्यांच्या पथ्यावर पडू शकते. मात्र दुसरीकडे शहरी भागाशी संपर्क कमी असणे ही त्यांची उणीव असू शकते. तर महायुतीचे हेमंत गोडसे यांना तीन वेळा निवडणुकीचा आणि सलग दहा वर्षे केलेली कामे ही जमेची बाजू असू शकते. त्याचबरोबर केंद्र शासनाची 370 कलम, राम मंदिर, ही कामे देखील जमेची बाजू असू शकतात. नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील तीन आमदार भाजपचे आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे मात्र यांनी लोकसभा निवडणुकीत किती सक्रिय सहभाग नोंदविला ते निकालानंतरच कळेल. त्याचबरोबर नाशिक जिल्हा हा मराठा बहुल मतदारसंघ असला तरी ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. राजाभाऊ वाजे आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर त्याचबरोबर महायुतीचे हेमंत गोडसे हे मराठा आहेत. त्यामुळे आता ओबीसी मते कोणाकडे जातात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. छगन भुजबळ यांची नाराजी, शांतीगिरी महाराज यांची निवडणुकीतील एन्ट्री कोणाला तापदायक ठरू शकते हे निकालानंतर कळेलच

2019 मध्ये काय घडले ?  हेमंत गोडसे (शिवसेना, विजयी) 5,63,599, समीर भुजबळ (राष्ट्रवादी) 2,71,395 माणिकराव कोकाटे (अपक्ष) 1,34,527 पवन पवार (वंचित बहुजन आघाडी) 1,09,981

Loading

Previous Post

होर्डिंग्ज दुर्घटना घडू नये म्हणून नाशिक शहरात असोसिएशनच्या वतीने घेतली जाते दक्षता

Next Post

नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन म्हणते “वोट कर नाशिककर”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White