• Latest
  • Trending
नाशिकवर ढगफुटीचं संकट! यंत्रणा अलर्ट; त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी मंदिर बंद,शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

नाशिकवर ढगफुटीचं संकट! यंत्रणा अलर्ट; त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी मंदिर बंद,शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

July 6, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकवर ढगफुटीचं संकट! यंत्रणा अलर्ट; त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी मंदिर बंद,शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्र्यांच्या इशारानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आदेश

नाशिक : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी पुराचे पाणी गावात शिरल्याच्या देखील घटना घडत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यभरात सुरू असलेले पावसाचे रुद्र रूप 8 जुलै पर्यंत असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुख्य म्हणजे नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तीन तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन व्यवस्था अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले. नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या तीन तालुक्यात जास्त पावसाची शक्यता आहे. पेठ, दिंडोरी, कळवण, सटाणा, बागलाण या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. पण कमी वेळात अतिमुसळधार पाऊस, ज्याला आपण ढगफुटी म्हणतो तसा पाऊस त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी परिसरात पडण्याची शक्यता आहे. नाशिक शहराच्या पश्चिम भागात जास्त पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून इशारा मिळेल तसा आपल्याला नेमका कुठे जास्त पाऊस पडणार याची माहिती अधिक स्पष्टपणे मिळेल”, असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले. त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी देवस्थान राहणार बंद
उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थान बंद ठेवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर शेवटची पूजा राहणार आहे.त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान परवापर्यंत बंद राहणार आहे. भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वरला येणं टाळावं. तसेच सप्तश्रृंगी मंदिराच्या परिसरात 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सप्तरश्रृंगी देवस्थान उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुका या भागातील सर्व शाळा, कॉलेज उद्या बंद राहणार आहे. नाशिक महापालिका आयुक्त आणि महापौर शहर भागातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवत असून त्यानुसार नियोजन करणार आहेत. त्याचबरोबर नदी काठच्या गावांना हाय अलर्ट चा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांनी देखील शेतीत टाळावे असे आव्हान करण्यात आले आहे. खाण्याच्या आणि जेवणाच्या वस्तू सोबत ठेवा…
नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके यांनी म्हटले की, ‘हा पाऊस वाढणार आहे, वेग वाढला तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत की, जिथं शक्य आहे तिथं बाहेर पडू नका. खाण्याच्या आणि जेवणाच्या वस्तू आधीच आणून ठेवा. उद्या घराबाहेर पडण्याचे टाळा, झाड पडू शकतं असे वाटल्यास अलर्ट राहा आणि कळवा. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यादृष्टीने काळजी घ्या.’

Loading

Previous Post

नाशिककरांनो तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना?

Next Post

नाशकात ढगफुटीच्या इशाऱ्यावर राजकीय वाद पेटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White