• Latest
  • Trending
योगेश्वरी जेजुरकर हिचे जलतरण स्पर्धेत यश

योगेश्वरी जेजुरकर हिचे जलतरण स्पर्धेत यश

September 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

योगेश्वरी जेजुरकर हिचे जलतरण स्पर्धेत यश

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

बंगालच्या गंगा नदीत 19 किलोमीटर अंतर दोन तास वीस मिनिटांत पार

नाशिकरोडच्या योगेश्वरी प्रशांत जेजुरकर हिने जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केल्याने संपूर्ण नाशिक शहरातून योगेश्वरी जेजुरकर हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन, सह आयोजक बंगाल आमेटूर स्विमिंग असोसिएशन, तसेच स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मुर्शिदाबाद याठिकाणी ७८ व्या इंटरनॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत ३६ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात मुले आणि मुलींचाही सहभाग होता.
याच स्पर्धेत नाशिकमधून बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
त्यात पत्रकार प्रशांत जेजुरकर यांची कन्या योगेश्वरी आणि प्रणव चीखले यांनीही सहभाग नोंदविला होता.
अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, शालेय शिक्षण घेत असलेल्या योगेश्वरी हिने अनेक जलतरण स्पर्धेत सहभागी होत नेत्रदिपक यश मिळवत सर्वांनाच चकित केले आहे. याबरोबरच तिला वडील प्रशांत जेजुरकर यांनीही मेहनत घेत आपल्या मुलीला या स्पर्धेमध्ये यशस्वी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नाशिकरोडच्या जिजामाता जलतरण तलावाचे प्रशिक्षकांचेही मोठे योगदान यामध्ये राहिले आहे.
आतापर्यंत मिळालेला अनुभव पणास लावत योगेश्वरीने बंगालच्या गंगा नदीत १९ किलोमिटर अंतर दोन तास वीस मिनिटामध्ये यशस्वीरीत्या पार केले. यावेळी तिच्यासह नाशिकचा प्रणव चिखले हाही होता.
या स्पर्धेचा समारोप खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युसुफ ए, नियमत शेख, कोलकात्याचे परिवहन मंत्री स्नेह आशिष चक्रवर्ती, देवबुध्द दास, माधुरी घोष, यांच्या हस्ते योगेश्वरी आणि प्रणव चिखले यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले

जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप, विकास भडांगे, शंकर मादगुडी, हरी सोनकांबळे, अनिल जगताप, प्रभाकर रेवडे यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
तसेच साधना एज्युकेशन स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे योगेश गाडेकर,केजे मेहता हायस्कूल, महाविद्यालयाचे प्रविण जोशी यांचेही योगेश्वरीला मार्गदर्शन लाभले.
नाशिक जिल्हयातील खेळाडू विविध खेळांमध्ये नावलौकिक मिळवीत असताना पत्रकार, दिशा न्युज चॅनलचे प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर यांच्या कन्येने जलतरण क्षेत्रात जे प्रावीण्य मिळविले त्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना शासनाने मदत केली पाहिजे त्याचबरोबर समाजातील इतर घटकांनी देखील पुढे येत या नवीन खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत खेळाडू क्षेत्रातील मान्यवर उपस्थित करत असून आपल्या देशात फक्त क्रिकेट या खेळाकडे पाहिले जात असल्याने इतर क्षेत्रातील खेळाडूंना न्याय मिळत नसल्याची भावना काही खेळाडूंनी व्यक्त केली आहे.

Loading

Previous Post

नाशिकमध्ये सर्वात मोठा “जीएसटी” घोटाळा उघड

Next Post

“भास्क्या डॉन”ची भाईगिरीची नशा पोलिसांनी उतरवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White