• Latest
  • Trending
नाशिकमध्ये 70 लाख लुटणारी बनावट अधिकाऱ्यांची टोळी गजाआड

नाशिकमध्ये 70 लाख लुटणारी बनावट अधिकाऱ्यांची टोळी गजाआड

July 15, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये 70 लाख लुटणारी बनावट अधिकाऱ्यांची टोळी गजाआड

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मोटारीत सापडले खोटे सरकारी ओळखपत्रे व बनावट पिस्तूल

नाशिक  : भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवत ७० लाखांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना मोठे यश आले आहे.मुख्य म्हणजे आयकर सीबीआय ईडी गृह लाचलुचपत प्रतिबंधक या तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून ते अनेकांना लुटत होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील आठवडय़ात पंचवटी परिसरातील  दिंडोरी येथे काही संशयित सरकारी लाल दिवा लावलेल्या इनोवा मधून आले त्यांनी स्वतःला पोलीस असल्याची बतावणी केली.फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर फिर्यादीच्या पिशवीतून 70 लाख रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतला  त्याचबरोबर  जीवे  मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून  फिर्यादीला मुंबई- पुणे  महामार्गावर उतरून दिले होते याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर व संवेदनशील असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण गुन्हे शाखेचे उपयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करण्यात आली.मानवी माहिती,तांत्रिक विश्लेषण,गोपनीय माहिती या  तपासाच्या आधारे घटनास्थळावरील धागेदोरे व परिस्थितीजन्य पुरावे एकत्र करत अखेर पोलिसानी संशयितांनचा माग काढला. अटकेतील आरोपींमध्ये एक उत्तर प्रदेशातील एक झारखंड तर एक जण वसईचा रहिवासी आहे महिला आरोपी मुळची जळगावची आहे. दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत उमा शंकर प्रेम शंकर वर्मा  (वय 40) राहणार रामनगर आजमगड उत्तर प्रदेश, सुजित कुमार राजकिशोर दुबे  (वय 32) राहणार मोती नगर शिंद्री झारखंड, निलेश अशोक पका  (वय 27) राहणार महाकाली मंदिराजवळ वसई, संगीता हंसराज अहिरे  (वय 43) राहणार कोणार्क नगर नाशिक यांना अटक करण्यात यश आले.  या आंतरराज्य टोळीकडून पोलिसांनी 55.10 लाखांची रोकड लाल निळा दिवा असलेली कार, एअर गन एमपी -5 बनावट रायफल, त्याचबरोबर आयकर, गृह, सीबीआय आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, रेल्वे पास तसेच विविध सरकारी शिक्के असा 82.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.                 कुणी बॉटल विक्रेता तर कोणी रिक्षावाला…… पोलीस पथक साध्या वेशात आरोपींच्या शोधासाठी वसई विरार भागात दोन दिवस मुक्कामी होते. अटकेतील एक संशयित वसईतील असल्याने आरोपी लुटीनंतर त्याच्याकडे एक दिवस मुक्कामी होते. याच अनुषंगाने नाशिकचे पोलीस पथक वसईत गेले. तेथे पथकातील एक जण रिक्षावाला तर एक जण पाणी बॉटल विक्रेता म्हणून राहिला. मात्र पथकाला गुंगारा देऊन संशयित लुटारू नाशिक मध्ये आले होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना ही माहिती मिळताच नाशिकला सापळा रचण्यात आला. हिस्सा देण्यासाठी आले आणि जेरबंद झाले….. संशयित आरोपी संगीता हंसराज अहिरे ईला लुटीनंतर नाशिकला सोडून संशयित तिघे वसई विराट कडे रवाना झाले होते मात्र माझा हिस्सा मला हवा म्हणून तिने तिघांकडे तगादा लावला पैसे दिले नाहीत तर पोलिसांना ठाव ठिकाणा सांगेल या भीतीने तिघे पुन्हा कारणे नाशिकला आले मात्र त्यांचा हा डाव फसला आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संगीताला रेल्वेत नोकरी लावून देण्याची आम्हीच दाखवून आपल्या गॅंगमध्ये सामावून घेतली संगीता ही आडगाव परिसरात भाड्याने राहत होती तिच्या घरातून एक लाखाची रोकड जप्त केल्याचे समजते. या तपासात यांची मोलाची कामगिरी….. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंखे, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, मुख्तार शेख यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, कर्मचारी विशाल काठे, प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनील भोसले, नुजा एलवे, सुकाम पवार, मुश्रीफ शेख यांनी वेशांतर केले होते तर पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख, विशाल देवरे, नाजीम खान पठाण, मनीषा सरोदे, यांनी मुद्देमाल जप्तीचे काम केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे धनंजय, कैलास चव्हाण, यांनी सायबर तपास केला तर योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी, लीला सुकटे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती द्वारे कारवाई करण्यात आली. एपीआय जया कारडे, प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मस्के, समाधान पवार, सुनील चव्हाण यांची देखील भूमिका महत्त्वाची राहिली

Loading

Previous Post

संतापजनक ! कायद्याच्या बालेकिल्ल्यात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Next Post

त्यांनी थेट त्या कुटुंबाला संपवायचाच प्लॅन आखला! 30 किलोमीटरपर्यंत मृत्यू मागे धावत होता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White