• Latest
  • Trending

नाशिकमध्ये जोरदार राडा,आजी-माजी आमदार भिडले

May 20, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये जोरदार राडा,आजी-माजी आमदार भिडले

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

ठाकरे गट व भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने

नाशिक :महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र समजला जातो पण या महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या नाशिक शहरात आज मतदानाच्या दिवशी दोन आजी-माजी आमदार भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या नाशिक परिसरातील भद्रकाली भागातील घास बाजार येथे मतदान केंद्राबाहेर भाजपाच्या आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार वसंत गीते यांच्यात जोरदार हमरी-तुमरी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. मिळालेल्या माहितीनुसार घास बाजार येथील मनपाच्या अब्दुल कलाम उर्दू शाळेत शांततेत मतदानाला सुरुवात झाली होती. यावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास फरांदे यांनी मतदान केंद्रावर येत मतदारांकडील चिठ्ठ्या तपासण्यास सुरुवात केली. काही महिला मतदारांची ओळख तपासणी देखील त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत मतदान केंद्रात आमदार का आल्या असा सवाल केला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली. यातून दोन्ही गट एकमेकांसमोर आले यावेळी दोन्ही गटातील समर्थकांनी आरडाओरडा, घोषणाबाजी केल्यामुळे वाद वाढत असल्याचे बघून मतदारांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला होता. यामुळे परिसरात तणाव वाढला होता.यादरम्यान सोशल मीडियात या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तणावात अजून भर पडली. या घटनेची माहिती मिळताच तेथील बंदोबस्तावरील भद्रकाली पोलिसांसह गुन्हे शाखा व सहस्त्र पोलिसांच्या पथकाने धाव घेत दोन्ही गटांमधील समर्थकांना लांब करण्यात यश मिळविले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी मध्यस्थी करत वसंत गीते यांना बाजूला नेले तर आमदार देवयानी फरांदे यांना देखील पोलिसांनी दुसऱ्या बाजूला नेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले .यामुळे मोठा अनर्थ टळला, शहरात दिवसभर या घटनेची चर्चा सुरू होती.

Loading

Previous Post

रखरखत्या उन्हात मतदारांच्या रांगा, प्रशासनाकडून मतदारांची प्रचंड गैरसोय

Next Post

1 जूनपासून नवे नियम,आता आरटीओत जाण्याची गरज नाही…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White