• Latest
  • Trending

नाशिकच्या मा. नगरसेवकाच्या अतिक्रमणाचा मुद्दा थेट विधानसभेत..

July 5, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या मा. नगरसेवकाच्या अतिक्रमणाचा मुद्दा थेट विधानसभेत..

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

त्यांना कोणीतरी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली — मा. नगरसेवक मुशीर सय्यद

नाशिक : नाशिक शहरातील माजी आमदार व उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत गिते यांच्या कार्यालयाचे मुंबई नाका येथील  अतिक्रमण महानगरपालिकेने उध्वस्त केल्यानंतर आता नाशिक शहरातील एका माजी नगरसेवकाच्या हॉटेलचे अतिक्रमण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे .सध्या उद्धव ठाकरे गटात असलेले व माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचे  नाशिक शहरातील सारडा सर्कल येथील हॉटेल एस एम इम्पेरियल्स ची इमारत अतिक्रमण मध्ये असल्याचा आरोप थेट विधासभेच्या लक्षवेधीमध्ये करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे विधानसभेत ही लक्षवेधी मांडली ती भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी यामुळे राजकिय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिम समाजाच्या दृष्टीने दफनविधीची जागा महत्वाची मानली जाते. मात्र याच जागेवर म्हणजेच दफनविधीच्या जागेत माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी हॉटेल उभे केल्याचा आरोप राणे यांनी  विधानसभेत केला. महापालिकेने ही जागा राखीव ठेवल्यानंतर त्या जागेत हॉटेल उभे असून त्यासाठी जागेचे विभाजन दाखवण्यात आले आहे. अशाप्रकारच्या जागेचे विभाजन करण्याचा अधिकार केवळ आयुक्तांना असताना ते महापालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्याने केले आहे. त्याचबरोबर महापालिकेत कुठल्याही बांधकामाच्या परवानग्या घेण्यासाठी सामान्य नागरिकांना अनेक महिने चकरा माराव्या लागत असताना मुशीर सय्यद यांच्या हॉटेलच्या सर्व परवानग्या एका दिवसात कश्या देण्यात आल्या असाही आरोप विधानसभेत नितेश राणे यांनी केल्यानंतर नाशिक महापालिकेचा संबंधित विभाग देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चर्चा होऊ लागली आहे. राणे यांच्या उपस्थित प्रश्नावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चौकशी करून 15 दिवसात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे लोकसभेच्या आधी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचे गँगस्टर सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप विधासभेच्या नितेश राणे यांनीच केला होता. त्यानंतर माजी महापौर वसंत गिते याचे कार्यालय अतिक्रमण मध्ये असल्याचे सांगत महानगरपालिकेने कारवाई केली होती यावर गिते यांनी सरळ या कारवाईमागे भाजपा आमदार देवयानी फरांदे असल्याचा आरोप केला होता आणि आता पुन्हा ठाकरे गटात असलेले मुशीर सय्यद यांचे हॉटेल शहरातील दफनभूमीच्या जागेत असल्याचा आरोप विधानसभेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे . मुख्य म्हणजे मुशीर सय्यद हे खा. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात. यामुळे ठाकरे गटाचे एक-एक नेते टार्गेट तर केले जात नाहीत ना ? त्याचबरोबर  नितेश राणे यांना नाशिकच्या ठाकरे गटातील नेत्यांची महिती नाशिकचा कोणता नेता देतो ? असाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. विधानसभेच्या निवडणुक जवळ येत असल्याने नाशिकच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आमदार नितेश राणे यांनी माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्यावर अन्य गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यांची कोणीतरी दिशाभूल करत आहे -मा नगरसेवक मुशीर सय्यद  यासंदर्भात न्यूज ब्लॅक अँड व्हाइट च्या टीमने मा नगरसेवक यांच्याशी संपर्क साधत माहिती घेतली याबाबत ते म्हणाले संबंधित आमदारांची कोणीतरी दिशाभूल करत असून त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. एस एम इम्पेरियल्स हॉटेल हे दफनभूमीच्या जागेवर बांधलेले नसून दफणविधीची जागा मागील बाजूस आहे. संबंधित जागेवर आमच्या पूर्वजांची दुकाने होती. हायकोर्टातून ऑडर आणून ती जागा खाली करून मग इमारत बांधण्यात आली आहे. हॉटेल असलेला भूखंड कमर्शियल झोन मध्ये आहे. 2011 मध्ये त्याला कमिन्समेंट दाखला मिळालेला असून 2013 मध्ये आयुक्तांच्या अहवालानुसार या इमारतीसाठी पुर्णत्वाचा दाखला देण्यात आला  त्यामुळे हे बांधकाम वैध आहे.

Loading

Previous Post

महाराष्ट्रातील या शहरात पहिला गुन्हा दाखल….

Next Post

नाशकात थरार,भावासमोरच भावाचा घरात घुसून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White