नाशिकच्या या प्रकरणाने राज्याला हादरवलं

नाशिक : इंदिरानगर परिसरातील नामांकित आयटी कंपनीत हिंदू महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याप्रकरणी भाजपच्या युवा मोर्चाने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या ठिय्या आंदोलनामुळे वातावरण तापले होते. या मल्टिनॅशनल कंपनीच्या कार्यालयात मागील पाच वर्षापासून नोकरीला एकत्र असताना तेथील सहा पुरुष कर्मचाऱ्यांनी हिंदू महिला कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी विनयभंग केला. तसेच एका पिढीतेला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचबरोबर संशयतांनी बळजबरीने धार्मिक विषयावर चर्चा करून आक्षेपार्ह वक्तव्य करत भावना दुखविण्याचाही आरोप पिढीतांकडून फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. पीडित शाकाहारी असल्याने माहीत असताना सुद्धा बळजबरीने मांसाहार खाद्यपदार्थ खाण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यालयातून सुट्टी झाल्यानंतर पीडित महिलेचा पाठलाग करत घाणेरडी शेरेबाजी सुद्धा केल्याचे म्हटले आहे. यामध्ये एका हिंदू तरुणाचे धर्मांतर केल्याची माहिती मिळत आहे. संशयीत आरोपी हे संबंधित कंपनीमध्ये ग्रुप लीडर व तत्सम पदांवर कार्यरत होते आपल्या सहकारी अथवा टीम मधील महिला सदस्यांशी कधी मैत्रीच्या तर कधी वरिष्ठ म्हणून वेगवेगळ्या बहाणा करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. तसेच वेळोवेळी या पीडित महिला कर्मचाऱ्यांसोबत आक्षेपार्ह भाषेत संवाद साधून किंवा अश्लील हावभाव चाळे करत खाजगी आयुष्य वैवाहिक जीवनाविषयी वारंवार विचारणा करून विनयभंग आणि मानसिक छळ करत असल्याचे पिढीतांचे म्हणणे आहे. या संदर्भात गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाच्या स्तरावर विशेष तपास पथक गठीत केले आहे भाजपचे आक्रमक आंदोलन व ठिय्या घटनेच्या निषेधार्थ आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनाने निवेदन घेण्यास नकार दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. “लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद सुरू झाला आहे,” अशी टीका करत या प्रकरणाचा तपास केवळ ‘एसआयटी’ने नाही, तर ‘सीबीआय’ने करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.यादरम्यान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंपनीसमोर जोरदार घोषणाबाजी केली व कंपनीचे गेट खोलत कंपनीमध्ये प्रवेश केला यादरम्यान पोलिसांनी व तेथील सिक्युरिटी गार्ड यांनी कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली यादरम्यान भाजप पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

![]()












