• Latest
  • Trending
नाशकात हत्या मग आत्महत्या ; तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणानेही घेतला गळफास

नाशकात हत्या मग आत्महत्या ; तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणानेही घेतला गळफास

July 18, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात हत्या मग आत्महत्या ; तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणानेही घेतला गळफास

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

हत्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे इंदिरानगर भागात दहशतीचे वातावरण

नाशिक  :  इंदिरानगर  परिसरात तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर याच परिसरात काही तासांतच संशयित आरोपी तरुणानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार  नाशिकच्या गजबजलेल्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास तरुणीच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. खून केल्यानंतर हल्लेखोर प्रियकर फरार झाला होता. वैष्णवी  अनिल आवारे ( वय 20)असे या तरुणीचं नाव असून तिच्या एक्स बॉयफ्रेंडने असलेल्या  साहिल अशोक लव्हारे याने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उडकीस आली आहे. मयत तरुणी मूळची अंमळनेरची असून, नाशकात ती शिक्षणाकरिता कानडे रोहाऊसमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेली असताना संशयित तरुण आला. तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं प्रतिसाद दिला नाही. निघून जाताना संशयिताने खिशातून चाकू काढून तरुणीच्या गळ्यावर वार केले. घाव वर्मी लागल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि  जागीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मैत्रिणीने आरडाओरड केल्यानंतर तो तिथून पळून गेला. पण जास्त लांब जाऊ शकला नाही. वैष्णवी आणि साहिल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते. पण वैष्णवी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार असल्याचे समजल्यामुळे साहिल प्रचंड संतापला होता. साहिल लाव्हारे याच्यासोबत वैष्णवीचा जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असताना वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवरून त्यांचे संभाषण ऐकलं. ‘वैशूला आज संपवलं’ असं म्हणत त्याने नवऱ्याला फोनवर विचारलं की, “तू कुठे आहेस, तुला इथे पोहोचायला किती वेळ लागेल?” पण मैत्रिणीने आरडाओरड केल्यानं लोक जमा झाली अन् साहिलने पळ काढला. पोलीस साहिलचा शोध घेत असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच वैष्णवीची हत्या केली तिथून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक  वरील एका झाडाला साहिल लाव्हारे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याच रागातून आणि प्रेमात वेड्या झालेल्या साहिलने वैष्णवीचा काटा ताढला. नाशिक पोलीस संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. लिव्ह-इन रिलेशनशिप’ एका  तरुणाबरोबर आणि  लग्न दुसर्‍या  तरुणाबरोबर…. पोलीस तपासात या हत्येमागील अत्यंत धक्कादायक पार्श्वभूमी समोर आली आहे. मृत वैष्णवी आणि आरोपी साहिल हे एकमेकांच्या ओळखीचे होते आणि त्यांच्यात आधी प्रेमसंबंध होते. काही काळापूर्वी ते दोघे उमरखेड येथे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये एकत्र राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत असल्याने वैष्णवी नाशिकला राहण्यासाठी आली होती. इथं तिची ओळख गोपाल नावाच्या अन्य एका तरुणाशी झाली होती. वैष्णवी ही नाशिकमध्ये काही दिवस गोपालच्या बहिणीसोबत राहत होती. त्यामुळे दोघांची ओळख झाली. याच ओळखीतून वैष्णवी आणि गोपाल यांच्या भावनिक नातं निर्माण झालं. दोघांनी लग्नाचा विचारही केला. याच दरम्यान, वैष्णवी दुसऱ्या तरुणाशी लग्न करणार असल्याची कुणकुण साहिलला लागली आणि तो प्रचंड संतापला. तो दोन ते तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आला होता. तो वैष्णवीला वारंवार फोन करून त्रास देत होता. तसेच तिला सोबत चलण्यासाठी गळ घालत होता. मात्र वैष्णवीला गोपालशी लग्न करायचं होतं. त्यामुळे तिने साहिलसोबत जाण्यास नकार दिला. याच कारणातून साहिलने वैष्णवीचा खून केल्याचा अंदाज आहे. वैष्णवीची हत्या केल्यानंतर काही तासांत साहिल देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.





Loading

Previous Post

नाशिकचे इंदिरानगर हादरले ! रस्त्यावर तरुणीची चाकूने सपासप वार करून हत्या

Next Post

“अशोकामार्ग” परिसरात एसटी बस झाडावर आदळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White