• Latest
  • Trending
नाशकात शिंदे गटाचा ऑपरेशन टायगर चा प्लॅन फसला?

नाशकात शिंदे गटाचा ऑपरेशन टायगर चा प्लॅन फसला?

July 16, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात शिंदे गटाचा ऑपरेशन टायगर चा प्लॅन फसला?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मातोश्रीवर नगरसेवकांची एक निष्ठेची शपथ

नाशिक  : शिंदे गटाच्या  शिवसेनेने ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेने आपला मोर्चा नाशिक महानगरपालिकाकडे वळवला  यादरम्यान 15 पैकी 12 नगरसेवक शिंदे गटाच्या  शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने  ठाकरे  गटाचे वरीष्ठ नेते  अ‍ॅक्टिव्ह मोडवर आले.या सर्व चर्चांना बुधवारी  ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर  मातोश्री वरुण व 15 नगरसेवकांना हजर होण्याचे आदेश आल्यानंतर सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने मातोश्रीवर हजर झाले. नाशिकच्या नगरसेवकांशी  तासभर चर्चा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवक व प्रमुख  यांच्याबरोबर सुमारे तासभर  सविस्तर चर्चा केली. बैठकीला जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख  गिते, गटनेते केशव पोरजे यांच्यासह १४ नगरसेवक उपस्थित होते. नगरसेविका मंगला आढाव प्रकृती अस्वास्थामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने पुत्र रोशन आढाव बैठकीला उपस्थित होते.यावेळी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर व माजी खासदार विनायक राऊत हेही बैठकीला उपस्थित होते. नगरसेवकांनी, ‘आम्ही पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत, एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडली. प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्र संवाद साधून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. उपमहापौरपद आणि पाच कोटींच्या आमिषाबाबत नगरसेवकांनी माहिती दिली. हा प्रकार गंभीर असून, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला ठाकरे यांनी दिल्याचे समजते. त्याचबरोबर मातोश्री बंगल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या समोर एकनिष्ठतेची शपथ घेतली. एकनिष्ठ राहिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पक्षाची साथ सोडू नका, असा संदेश उद्धव ठाकरे  नगरसेवकांना दिला. मुंबई मनपा प्रमाणेच नाशिकमध्येही निधी देताना अन्याय केला जातो त्यामुळे न्यायालयात याचिका का दाखल करण्यावरही चर्चा झाल्याचे समजते. त्याचबरोबर आगामी सिंहस्थ कुंभमेळा शहरातील राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर उद्धव ठाकरे लवकरच नाशिकचा दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे

Loading

Previous Post

त्यांनी थेट त्या कुटुंबाला संपवायचाच प्लॅन आखला! 30 किलोमीटरपर्यंत मृत्यू मागे धावत होता

Next Post

नाशिकचे इंदिरानगर हादरले ! रस्त्यावर तरुणीची चाकूने सपासप वार करून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White