गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारला कारवाईचा बडगा

नाशिक : भयमुक्त नाशिक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून आता गुन्हेगारी क्षेत्रात असताना राजकारणात आपले पाय मजबूत करू पहाणारे नेते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या रडावर आहेत.गंगापूर आणि सातपूर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनेत भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांचे निकटवर्तीय मामा राजवाडे यांची 15 तास कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.काही दिवसांपूर्वी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे मामा राजवाडे हे यापूर्वी ठाकरे गटात नाशिक शहराचे महानगरप्रमुख म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा पक्षप्रवेश हा त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीपासून बचाव करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा त्या काळात मोठ्याप्रमाणात रंगली होती. त्याचबरोबर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे या पिता पुत्रांना देखील पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर आता भाजपनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील नाशिक पोलिसांच्या रडारवर असल्याचे चित्र आहे.यामध्ये नुकतेच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक पवन पवार असून समाजात दहशत निर्माण होईल व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असे फलक लावून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पवन पवार आणि विशाल पवार यांना शोधण्यासाठी त्यांच्या घरी व कार्यालयावर छापा मारला मात्र घराला कुलूप आढळून आले. तर दुसऱ्या घटनेत नुकतेच मनसे मधून शिंदे गटाच्या शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक योगेश शेवरे, आणि विक्रम नागरे यांचा समावेश आहे. गंगापूर रोडवरील रस्त्यावर पोलीस आयुक्तालयापुढे विनापरवानगी सर्वसामान्य नागरिक, महिला, मुले, व्यापारी वर्गात भीती दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फलक लावल्याने माजी नगरसेवक योगेश शेवरे,, विक्रम नागरे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मनपाच्या होर्डिंगवर स्वतःच्या वाढदिवसाचे फलक लावल्यापप्रकरणी अंबादास जाधव यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.त्यामुळे भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेत खळबळ उडाली असून दोन्हीही मित्र पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. यापुढे अजून कोणते नेते रडारवर आहेत याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.

![]()












