नाशिकचे राजकीय वातावरण तापले .भाजप नेत्या पंकजा मुंडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल

नाशिक : विधानसभेची निवडणूक अंतिम टप्यात असताना नाशिक शहरातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येत असल्यामुळे वातावरण तणावपूर्ण होत आहे. काल नाशिक पूर्व मतदारसंघात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन मोठा राडा झाला होता. यावेळी पूर्व चे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. तर भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गाड्यांवर हल्ला केला. असल्याचा आरोप केला होता यादरम्यान खा. सुप्रिया सुळे यादेखील आक्रमक झाल्या होत्या तसाच काहीसा प्रकार आज नाशिक पश्चिम मतदारसंघात घडला.पश्चिम मतदारसंघात भाजप महायुतीच्या सीमा हिरे या उमेदवार असून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर आहेत तर मनसेच्या वतीने दिनकर पाटील हे उमेदवारी करत आहेत. या मतदारसंघात आज
पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.यामुळे सिडको परिसरात तणाव निर्माण झाला होता.भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्यावर मारहाण आणि गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. यावर पलटवार करत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर म्हणाले भाजपचे आरोप खोटारडे असून पैसे वाटण्याचा प्रकार होत होता तर समोर आणणे गरजेचं होते. ते गुंड घेऊन आले आणि बंदुकीने मारहाण केली. आमचीही मागणी आहे की दोषींवर कारवाई करावी मात्र सावता नगर परिसरात एकमेकांवर आरोप करत बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाल्याचे समजते.या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सीमा हिरे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. असून अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही बाजूंचे समर्थकांनी गर्दी केली होती. गुंडगिरी खपवून घेणार नाही- आ .पंकजा मुंडे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या ही घटना गंभीर आहे. गुंडगिरी चालणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला, मी यावर पोलिसांना लक्ष घालण्याचे सांगितले आहे. याठिकाणी महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभी असताना ही घटना घडली आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. आमची निवडणूक विकासावर सुरू असल्याचे देखील मुंडे म्हणाल्या



![]()












