• Latest
  • Trending

दीपक बडगुजर यांच्यावर “मोक्का”चा फास

October 22, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

दीपक बडगुजर यांच्यावर “मोक्का”चा फास

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक शहरातील सहा जणांच्या टोळीवर मोक्का, पोलीस आयुक्तांची कारवाई..

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार व्यस्त असतानाच आज ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व पश्चिम मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करणारे सुधाकर बडगुजर  यांचा मुलगा संशयित दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत फास आवळल्याने  सुधाकर बडगुजर आणि ठाकरे गटासाठी हा एक धक्काच मानला जात आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरपीआयचे पदाधिकारी अँड प्रशांत जाधव यांच्यावर तीन वर्षांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता हा गोळीबार दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याने त्यांनाही या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्यात पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी बडगुजर यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला मात्र या प्रकरणाने कलाटणी घेतली असून पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदायांतर्गत (मोक्का)कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अजून सहा जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून यामध्ये संशयित मयूर बेद (37,जय भवानी रोड) श्रीकांत उर्फ बारक्या वाकुडे (32,जेतवनगर) सनी उर्फ टाक्या रावसाहेब पगारे (31 जेतवनगर) आकाश आनंद सुर्यतळ(24,नाशिकरोड) प्रसाद संजय शिंदे (29, नांदूर गाव)अंकुश उर्फ परिणय लक्ष्मण शेवाळे(29,सिडको) यांच्यावर मोक्का चा फास आवळण्यात आला असून मुख्य मयूर बेद याची टोळी संघटितपणे गुन्हेगारी करत कायदा व सुव्यवस्थेला वारंवार धोका निर्माण करत असल्याने ही कारवाई करण्यात आली. हे सहाही संशयित मध्यवर्ती कारागृहात आहेत. ही माहिती सोमवारी न्यायालयात देखील देण्यात आली. पोलीस न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार जिल्हा सत्र न्यायालयात 10 ऑक्टोबर रोजी बडगुजर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती यादरम्यान तपासी अधिकारी व सहायक पोलिस आयुक्त मिटके यांनी टोळीविरुद्ध  संघटितपणे कट रचून हल्ला केल्याचे समोर आल्याने मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले होते. दरम्यान त्यास  आता मंजुरी मिळाल्याने मोक्काच्या गुन्ह्यात तो हवा असल्याने त्याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी पोलीस न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती मिळते आहे.

Loading

Previous Post

मा खा.समीर भुजबळ हाती “मशाल” घेण्याची शक्यता !

Next Post

फरांदे समर्थक मुंबईतील”सागर” किनारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White