• Latest
  • Trending
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे कठोर निर्णय

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे कठोर निर्णय

April 24, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे कठोर निर्णय

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ निष्पाप लोकांची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर त्याचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.

वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर आणि निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयांचा उद्देश पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक दबाव वाढवणे असा असून, यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  पाकिस्तानी राजदूतांना भारत सोडण्याचे आदेश——– भारताने पाकिस्तानच्या राजदूतांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध पूर्णपणे तुटण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे . संवादाच्या सर्व शक्यता यामुळे कमी होताना दिसत आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश——- पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे द्विपक्षीय संबंधांवर ताण वाढणार असून, मानवी हक्कांचे प्रश्नही उपस्थित होण्याची शक्यता आहे. सिंधू जल कराराची अंमलबजावणी स्थगित——–

भारताने 1960 मध्ये झालेल्या सिंधू जल कराराची अंमलबजावणी तात्पुरती थांबवली आहे. यामुळे झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांवरील पाकिस्तानचा पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा पाकिस्तानच्या शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.  अटारी सीमा बंद—– भारत-पाकिस्तानमधील अटारी सीमा तात्काळ बंद करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी देवाणघेवाण आणि प्रवास पूर्णपणे ठप्प झाला आहे. विशेषतः लहान व्यापारी आणि सीमावर्ती भागातील उद्योग यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, भारत-अफगाणिस्तान व्यापारालाही अडचणी येणार आहेत, कारण तो पाकिस्तानमार्गे होतो. भारताने घेतलेले हे कठोर निर्णय पाकिस्तानवर दडपण वाढवण्यासाठी असून, त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्याला मोठा धोका निर्माण होणार आहे.  भारत सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत—– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियावरून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावरच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सुरक्षा समितीची बैठक घेतली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तिन्ही लष्करी दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि लष्करी संचालनालय प्रमुख यांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच लष्कराला युद्धाच्या तयारीत राहण्याचे आणि दहशतवादविरोधी कारवायांची मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करण्यासाठी प मोठे निर्णय घेण्यात आले.

Loading

Previous Post

नाशकात कारचालकाचा प्रताप

Next Post

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White