
नाशिक : देवाच्या दारातच भक्ताला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्ताला सुरक्षारक्षकांकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. मोबाईल कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला असून शिवभक्तांमध्ये यानंतर संतापाची लाट उसळली आहे. रविवारी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुन्हा एकदा भाविकाला सुरक्षारक्षकांकडून मारहाण करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण करत भाविकाला मंदिराबाहेर काढल्याचे
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, मंदिरातील सुरक्षारक्षक भाविकावर तुटून पटले आहेत. त्याला कानाखाली, लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. मारहाण इतकी बेदम आहे की, त्याचे कपडेही फाटल्याचं दिसत आहे. या दरम्यान गर्दीत कुणीतरी काढलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

![]()











