
वृत्तसंस्था : मध्यपूर्वेत सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अंतही झाला आहे. यामुळे संपूर्ण इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र याच वेळी इस्रायलला खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा सुगावा कसा लागला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खामेनी हे इराणमधील त्यांच्या राजवाड्यात त्यांच्या जवळच्या सल्लागारांसोबत बैठक घेत होते. पण या बैठकीची माहिती इस्रायली गुप्तचर संस्था मोसदला कोणीतरी दिली होती. मोसादला किती वाजता बैठक होणार आहे आणि तेथे कोण उपस्थित राहणार आहे याची माहिती होती. या माहितीमुळेच इस्रायलने सकाळी तात्काळ हल्ला करण्याचा निर्णय घेतला.मुळात इस्रायलने सुरुवातीला रात्री हल्ला करण्याची योजना आखली होती, परंतु सर्वोच्च नेत्याबद्दल माहिती मिळताच, तात्काळ हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला.एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की हा हल्ला अनेक महिन्यांपासून नियोजित असलेल्या ऑपरेशनल योजनेवर आधारित होता, इस्रायली अधिकाऱ्याने पुढे म्हटले की तीन ठिकाणी इराणी सरकारी बैठका होत होत्या. आणि तिन्ही ठिकाणी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले गेले.इराणचे सर्वोच्च नेते बराच काळ भूमिगत राहत होते. इस्रायल अमेरिकेविरोधात इराण यांच्यात सुरू झाल्यानंतर सर्वोच्च नेत्याने निवासस्थानी बैठक घेणे हे मोसादच्या पथ्यावर पडले. म्हणूनच, इस्रायलला त्यांच्या स्थानाची माहिती मिळताच, निवास्थानावर 30-40 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला.खामेनी यांचा मृतदेह राष्ट्रपती निवासस्थानी ढिगाऱ्यात सापडला

![]()












