वडील आणि भाच्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यु

नाशिकरोड : परिसरातील बिटको रुग्णालयालगत दुर्गा उद्यानाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास ब्लॅंकेट मध्ये गुंडाळलेल्या आलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती . पोलिसांनी पंचनामा करत शोध घेण्यास सुरुवात केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पित्याने आणि भाच्याने बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार जुना ओढा रोडवरील खर्जुळ मळा परिसरात नानाजी मोतीराम सूर्यवंशी (वय 70) राहतात ते विद्युत मंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत ते पत्नी, मोठा मुलगा सुनील(वय 35) व लहान मुलगा प्रकाश (वय 32) यांच्या सोबत राहतात. त्यांच्याच घराच्या वरच्या बाजूस त्यांची मुलगी सोनाली व तिचा पती विठोबा हे मुलगा गणेश जाधव (वय 26) यांच्या सोबत राहतात. मंगळवारी सकाळच्या सुमारास मयत सुनील सूर्यवंशी याने वडील नानाजी सूर्यवंशी यांच्यासोबत भांडण करत पाचशे रुपये घेऊन गेला. आणि रात्री नऊच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. सर्वजण झोपेत असताना मयत सुनील याने वडील नानाजी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यामुळे संतापलेल्या नानाजी यांनी सुनील याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा एकूण भाचा गणेश जाधव हा खालच्या घरात आला त्यानेही मामा सुनील सूर्यवंशी याला मारहाण सुरू केली. यादरम्यान वडील नानाजी व भाचा गणेश यांच्या बेदम मारहाणीत जखमी झालेला सुनील बेशुद्ध पडला त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास घाबरलेला भाचा गणेश याने मयत सुनील याला रुग्णवाहिकेतून बिटको रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात रीतसर दाखल न करता प्रवेशद्वाराजवळ सोडत पळ काढला. रात्रभर उपचार न मिळाल्याने व परिसरातील कुणाचे लक्ष न गेल्याने सुनील याचा मृत्यू झाला कदाचीत वेळेवर उपचार मिळाले असते तर सुनील वाचला असता याबाबत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.

![]()












