आधी खड्डे बुजवा,नागरिक संतापले

नाशिक : नाशिक शहरातील पडलेल्या खड्यांबाबत ब्लॅक अँड व्हाईट न्यूजने “नाशकात खड्डे की खड्यात नाशिक” ही बातमी प्रसिद्ध करत नाशिक शहरात रस्त्यात जे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातासारखे प्रकार घडून दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता यामध्ये भगूर येथे खड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर मेडिकल कॉलेज परिसरात दुचाकी घसरण एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनांना जबाबदार धरत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करून कारवाई का करू नये ? असा प्रश्न ब्लॅक अँड व्हाईट न्यूज च्या वतीने विचारण्यात आला होता . त्याचबरोबर आज देखील खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालत आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत .याच बातमीची दखल घेत नगरपालिकेने खोदलेल्या खड्यात पडून झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे यांना निलंबित करण्याचे आदेश भगूर नगरपालिकेच्या मुख्यधीकारी सुवर्णा दखणे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे पुढील चौकशी सुरू असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे अजूनदेखील रस्त्यांवर जे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनचालक, व्यावसायिक, नागरिक त्रस्त झाले लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी करत आहेत.


![]()












