• Latest
  • Trending

अन् चक्क “गटार” गेली चोरीला !

August 29, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अन् चक्क “गटार” गेली चोरीला !

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

कागदोपत्री गटार दाखवत 20 लाख 67 हजार रुपयांचा अपहार

नाशिक : मकरंद अनासपुरे यांचा “जाऊ तिथे खाऊ” या चित्रपटात विहीर चोरीची घटना दाखवण्यात आली होती. मुख्य म्हणजे हा चित्रपट नागरिकांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात उतरला होता.यातील कथा आपल्याला काल्पनिक वाटत असेल मात्र अश्या घटना घडल्या आहेत याउपर चक्क मालेगाव मध्ये गटार चोरीची देखील घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. मात्र ती चोरी आत्ता उघडकीस आली आहे हे विशेष, मिळालेल्या माहितीनुसार सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मालेगावच्या कॉलनी परिसरात फक्त आणि फक्त कागदोपत्री गटार दाखवीत ठेकेदाराच्या संगमताने काही अधिकाऱ्यांनी मिळून तब्बल 20 लाख 67 हजार 607 रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघड झाले . मालेगावच्या 60 फुटीरोडवरील स्टेट बँक भागात गटारीच्या कामासाठी सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली यांना सन 2012 मध्ये 49 लाख रुपयांचा ठेका देण्यात आला होता. मात्र ठेकेदार महापालिकेचे अधिकारी यांनी संगमत करत प्रत्यक्ष कामावर खर्च न करता अन्य ठिकाणांच्या गटारीचे काम दाखवत यामधून 20 लाख 67 हजार 607 रुपयांचा अपहार केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार पाटील यांनी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. यादरम्यान कोरोना काळात दोन वर्षे चौकशीचा वेग थंड झाला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण विभागाला या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यासाठी लागणारे शासन शुल्क अडीच लाख रुपये भरण्याचे आदेश मालेगाव महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार दक्षता व गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2022 मध्ये मालेगावी येत गटाराची पहाणी केली असता तक्रारदार तुषार पाटील यांनी दाखविलेल्या ठिकाणी गटार दिसून आली नाही. त्यानंतर महापालिकेत कार्यरत असलेल्या आजी-माजी अधिकारी म्हणजेच उपायुक्त, अभियंता, अधिकारी, लिपिक, लेखाधिकारी अशा पंधराजणांनी 2012 मध्ये आपल्या पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

Previous Post

“त्या” बातमीची दखल आणि तो अधिकारी निलंबित

Next Post

नाशिकच्या आई-मुलीचा रुद्रावतार ! भररस्त्यात छेड काढणाऱ्यांना चोपले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White