• Latest
  • Trending

“त्या” गुन्हेगारांनी गंजमाळच्या दिशेने वळण घेतले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले

August 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“त्या” गुन्हेगारांनी गंजमाळच्या दिशेने वळण घेतले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

मा.नगरसेविकेच्या घरातील लाखोंचे दागिने लुटणारे आंतरराज्यीय गुन्हेगार

नाशिक : दोन दिवसांपूर्वी राका कॉलनीतील नवकार रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या माजी नगरसेविका डॉ ममता पाटील यांचा बंद असलेला फ्लॅट मध्यरात्री फोडून लाखो रुपयांचे दागिने लुटून चोरटे गायब झाले होते. या घरफोडीमुळे एकप्रकारे चोरट्यानी पोलिसांनाच आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात गुन्हेगारांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या मुख्य म्हणजे चोरट्यानी जाताना सीसीटीव्हीचे डिव्हीआर घेऊन पळ काढल्याने पोलिसांसमोर तपास करताना अनेक अडचणी आल्या होत्या.  घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके, यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना तातडीने तपासाचे आदेश दिले. यादरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, मुख्तार शेख, आप्पा पानवळ राम बर्डे या पथकाने तपासाला सुरवात करत त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली यावेळी पथकाला एक क्लू मिळाला यामध्ये एका मोटारसायकलवर तिघे बसून उजवीकडे गंजमाळच्या दिशेने वळण घेत असल्याचे फुटेजमध्ये दिसले. त्याचबरोबर पोलीस अंमलदार विशाल काठे यांना संशयितांबद्दल माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीन पथके तयार केली यामध्ये उपनिरीक्षक रवींद्र बागुल, किरण शिरसाठ, सुरेश माळोदे, नाझीम खान पठाण, सुगंध साबळे, अनुजा येवले आदींचा यामध्ये समावेश करण्यात आला त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी गंजमाळ परिसरातील भीमवाडीच्या सर्व बाजूने सापळे रचले. आणि मोटारसायकलवर फिरणाऱ्या तिघांना अगदी सिनेस्टाईल पध्दतीने ताब्यात घेतले. त्या संशयितांना पाहून पोलिसांना देखील धक्का बसला.  यामध्ये गोरखसिंग गागासिंग टाक (35, रा भीमवाडी) अमनसिंग पंजाबसिंग टाक, दीपक तुकाराम जाधव (सर्व रा. भीमवाडी) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यामधील सराईत गुन्हेगार गोरखसिंग टाक हा पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, चोऱ्या करत होता.2008 सालापासून 2021 सालापर्यंत त्याच्यावर पुण्यात 19 गुन्हे दाखल आहेत. तो रक्षाबंधनासाठी नाशिकच्या गंजमाळ येथील येथील बहिणीकडे आला होता.त्याने येथील सराईत गुन्हेगार अमनसिंग याला हाताशी धरत या घरफोडीची योजना आखली, अमनसिंग टाक याच्यावर देखील नाशिकमध्ये इंदिरानगर, पंचवटी, सायखेडा पोलीस ठाण्यात घरफोडयांचे गुन्हे दाखल आहेत. यातील या घरफोडीचा मास्टरमाइंड पुण्याचा गोरखसिंग हा  होता 2019 मध्ये त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांनी मिळून हा कट रचत डॉ ममता पाटील यांच्या घरी घरफोडी करत 57 लाखाचे दागिने लुटून नेले मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याचे आढळत त्या ठिकाणाहून गोरखसिंग हा डिव्हीआर सोबत घेऊन पळ काढत असे याठिकाणी देखील त्याने तेच केले.त्या नोटा त्यांनी गोदावरी नदीत टाकल्या– त्या आरोपींनी घरातून दागिन्यांसह 1800 अमेरिकन डॉलर देखील गायब केले होते मात्र या नोटांच्या बंडलवर गांधीजींचा फोटो नसल्याचे बघत त्यांना नकली नोटा वाटल्याने त्यांनी त्या नोटा व डिव्हीआर गोदावरी नदीत फेकून दिल्याचे तपासात समोर आले. पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य– डॉ ममता पाटील यांच्या पूर्वजांचा ठेवा चोरीला गेल्याने पाटील यांना धक्का बसला होता. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासात चोरट्यांना गजाआड केल्याने त्यांना आनंद झाला त्यांनी पोलिसांचे आभार मानले. यशस्वी कामगिरी यांनी केली– पोउनि रवींद्र बागुल,किरण शिरसाठ,सुरेश माळेदे,सुगन साबरे,प्रवीण वाघमारे,धनंजय शिंदे,योगीराज गायकवाड,प्रशांत मरगड,संदीप भांड,रमेश कोळी,प्रदीप म्हसदे, महेश साळुंके,शरद सोनवणे,देविदास ठाकरे,राजेश लोखंडे,नाझीमखान पठाण,सुकाम पवार,मिलिंदसिंग परदेशी,विशाल देवरे, राम बर्डे,विलास चारोस्कर,जगेस्वर बोरसे,राहुल पालखेडे,अमोल कोष्टी,नितीन जगताप,अनुजा वेलवे,समाधान पवार आदींनी केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला 75 हजारांचे बक्षीस जाहीर केले. त्या सराईत गुन्हेगारांकडून 56 लाख 31 हजार 210 रुपये किमतीचे सुमारे 87 तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Loading

Previous Post

पोलिसांना आव्हान देत, माजी नगरसेविकेच्या घरात चोरट्यांचा एक कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

Next Post

रातोरात काढलेले 55 कोटींच्या धनादेशाचे भूत महापालिकेच्या मानगुटीवर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White