• Latest
  • Trending

तो सराईत गुन्हेगार सापडल्याने गोळीबाराचा होणार खुलासा ?

June 2, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

तो सराईत गुन्हेगार सापडल्याने गोळीबाराचा होणार खुलासा ?

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

अनेक गंभीर गुन्हे दाखल, पिस्तूलासह अटकेत

नाशिक : खुनाचा गुन्हा, गंभीर दुखापत,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, विनयभंग त्याचबरोबर अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार संशयित रोहित गोविंद डिंगम उर्फ माले (27,रा चेतनानगर) यास पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पध्दतीने पाठलाग करत गजाआड करण्यात यश मिळविले. मुख्य म्हणजे पवनगर भागात डिसेंबर महिन्यात रात्रीच्या सुमारास माजी नगरसेवकाच्या दिशेने गोळीबार करून डिंगम हा फरार झाला होता.नेम चुकल्याने नगरसेवक थोडक्यात बचावले होते. याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. एक इसम गावठी कट्टा घेऊन राणेंनगर, चेतनानगर परिसरात फिरत असतो, ही माहिती मिळताच पोलीस पथक त्याच्या मागावर निघाले असता ते इंदिरानगर परिसरातील राज टॉवर येथे पोहचले यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज टॉवर सोसायटीच्या परिसरात पाळत ठेवली, यादरम्यान डिंगम उर्फ रोहित याला पोलीस आल्याचा संशय आल्याने तो तेराव्या मजल्यावरील प्लॅटच्या गॅलरीतून सरळ टेरेसवर पोहचला. यावेळी टेरेसवर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात तो दुसऱ्या विंगच्या दिशेने पळाला, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले, याठिकाणी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असे दृश्य होते. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये मोबाईल व कंबरेला गावठी कट्टा मिळून आला त्यामध्ये एक जिवंत काडतुस मिळून आल्याची माहिती पथकाने दिली.मुख्य म्हणजे रोहित हा पोलिसांच्या यादीतील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याविरोधात यापूर्वी मोक्काअनव्ये कारवाई करण्यात आली आहे. रोहित गोविंद डिंगम उर्फ माले याच्यावर 2015 साली उपनगर परिसरात, घातक हत्यारांनी दुखापत करणे,2016 साली उपनगर परिसरात खून,2017 साली मुंबई नाका, खुनाचा प्रयत्न,2019 साली उपनगर, विनयभंग, मारहाण,2023 साली अंबड, खुनाचा प्रयत्न,2024,साली उपनगर, खुनाचा प्रयत्न, संशयित रोहित हा उपनगर येथील बेद गँगचा सदस्य आहे .त्याच्याविरुद्ध शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत इंदिरानगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रोहित पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे विशेष पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे, वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, बाळा नाद्रे,चंद्रकांत बागडे, विठ्ठल चव्हाण, गणेश वडजे अर्चना भड, दत्तात्रय चकोर, देवकिसन गायकर, भूषण सोनवणे, संजय ताजने, गणेश भामरे, भारत डबाळे, रवींद्र दिघे, मंगला जगताप, सविता कदम यांनी केली

Loading

Previous Post

आता सातबाऱ्यावर आईचेही नाव……

Next Post

नाशकात धनुष्य की मशाल,दिंडोरीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White