• Latest
  • Trending
तिदमे नॉट रिचेबल, समर्थकांची गर्दी

तिदमे नॉट रिचेबल, समर्थकांची गर्दी

February 8, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

तिदमे नॉट रिचेबल, समर्थकांची गर्दी

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

शिंदे गटाच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढणार

नाशिक : महापालिका निवडणुकीनंतर शहरातील राजकारणात काय घडेल याचा नेम नाही ? विकासाच्या नावाखाली कोण कोणाला पाठिंबा देईल हे सांगता येणे देखील अवघड झाले आहे. यामुळे प्रत्येक पक्षात नाराजी नाट्य घडत आहे. अशा नाराजीतून जन्म झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेत देखील अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेला उपमहापौर पद देण्यावरून खरंतर भाजपात वाद होणे अपेक्षित होते. मात्र या उलटे शिंदे गटाच्या शिवसेनेत वाद सुरू झाले. सुरवातीच्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नासिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे पहिले नगरसेवक म्हणून प्रवीण तिदमे यांची ओळख आहे. मात्र आज नाराजी नाट्यातून प्रवीण तिदमे हेच नगरसेवक आणि महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देण्यासाठी निघाले आहेत. याला कारण ठरले आहे ते उपमहापौरपद. विलास शिंदे यांच्यासह प्रवीण तिदमे व राहुल दिवे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरले होते मूळचे त्र्यंबकेश्वर येथील असलेले प्रवीण तिदमे यांनी सिडको परिसरात बाजी मारत चुंबळेसारख्या मातब्बर कुटुंबाचा पराभव केल्याने ते या पदाचे दावेदार मानले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी आलेले विलास शिंदे यांना उपमहापौर पदाची लॉटरी लागल्याने प्रवीण तिदमे यांचा संताप झाला. यादरम्यान प्रवीण तिदमे यांनी गटनेते अजय बोरस्ते व उपमहापौर विलास शिंदे यांच्यावर जहरी टीका करत नगरसेवकपद व महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला.मुळातच शिंदे गटाच्या शिवसेनेत समन्वय नाही. पक्षाचे संघटन वाढवण्याचे सोडून प्रत्येक नेता हा आपल्या फायद्याचा विचार करत असल्याची चर्चा खुद्द कार्यकर्त्यांमध्ये आहे.यामुळे सामान्य कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत बाजूला पडत चालले आहेत. याचे उदाहरण द्यायचे झाले तर सुरुवातीपासून बरोबर असलेल्या नाडे नावाच्या कार्यकर्त्याला तिकीट नाकारण्यात आले होते. त्याचप्रमाणे इतर पक्षातील कार्यकर्ते शिंदे गटांच्या शिवसेनेत येण्यासाठी अतुर असताना देखील तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात याची विचारणा केली जात असल्याने कधीही कुठल्या पक्षात काम न केलेल्या तरुणांमध्ये यामुळे नाराजी वाढत चालली आहे. मुख्य म्हणजे अजय बोरस्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर पदांची बरसात झाली हे देखील मान्य करावे लागेल त्याचबरोबर विलास शिंदे अलीकडेच पक्षात आले आणि जुन्यांना डावलून त्यांना संपर्कप्रमुख आणि आता थेट उपमहापौर पद दिले हे देखील तितकेच खरे आहे. मात्र यासाठी नागरिकांनी दिलेल्या मतदानाचा अपमान करत प्रवीण तिदमे यांनी राजीनामा देणे योग्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महानगर प्रमुख व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर तिदमे यांनी टाकली होती. या पोस्ट नंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक नागरिक व कार्यकर्ते तिदमे यांच्या घरी भेट देत आहेत. नागरिकांनी एकत्र येत निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान तिदमे नॉट रिचेबल असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख रामजी रेपाळे, हेमंत गोडसे, यांनी संपर्क साधला असल्याची माहिती तिदमे कुटुंबीयांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की अन्याय होऊ देणार नाही त्यांना त्वरित माझ्याशी संपर्क करायला सांगा पक्षात काही सुधारणा होतात का हे बघणे महत्त्वाचे ठरेल असेही शिंदे म्हणाल्याचे समजते.उपमहापौर विलास शिंदे आणि उपनेते अजय बोरस्ते यांनी मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सर्वच गट या बैठकीत सहभागी नसल्याने मतभेद अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त होत असून या भेटीत तोडगा निघू शकतो, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Loading

Previous Post

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना : दोषींवर कठोर कारवाईची छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

Next Post

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White