भ्रष्टाचारी सरकारला मशाल चूड लावल्याशिवाय गप्प बसणार नाही- उद्धव ठाकरे

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहण्यास सुरवात झाली असून त्यानिमित्ताने ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर परंपरेप्रमाणे यावर्षी देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मेळावा आज शिवतीर्थावर संपन्न झाला. यादरम्यान पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे,नेते संजय राऊत या सर्व नेत्यांनी भाषण करताना केंद्रातील एनडीए सरकार बरोबरच राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली यावेळी भाषणाची सुरवात करताना उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.आपल्यासमोर असलेली ही लढाई म्हणजे महाभारत आहे, पांडव पाच होते आणि कौरव शंभर. शकुनीमामा कोण तुम्हाला माहीत आहे. सुईच्या अग्रवार मावेल इतकीही जागा तुम्हाला देणार नाही अशी मस्ती कौरवांची होती. भाजपाचीही आज हीच भूमिका आहे. सुईच्या अग्रवार जमीन मावणार नाही पण ती अग्र तुमच्या कुठे टोचेल? आता तर तलवारी आहेत माझ्या समोर आहे. ज्यांनी तुम्हाला संकट काळात साथ दिली, महाराष्ट्रात यांना (भाजपा) कुणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही भाजपाला खांद्यावर घेतलं. आज आम्हाला भाजपाला खांदा द्यायचा आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका मी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सोडलेला नाही. भाजपाला लाथ घातली कारण त्यांचं गोमूत्रधारी हिंदुत्व मला मान्य नाही. मिंध्यांना सांगा बाळासाहेबांचा विचार हा तुझा विचार नाही. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण अशी जाहिरात मिंध्यांनी दिली आहे. त्याला सांगा पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान या ओळी राहिल्या. हे सगळे शेपूट हलवणारे आहेत. मी कुत्र्यांचा अपमान करणार नाही. आपण टाटांचंही श्वान प्रेम पाहिलं मी देखील कुत्र्यांवर प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे, पण मी लांडगा प्रेमी नाही. हे सगळे लांडगे आहेत. वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चाललं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.अब्दालींसारख्याच्या कितीही पिढ्या आल्या तरीही त्यांना गाडून मी त्यावर भगवा फडकवेन कारण मला तुमची साथ आहे. भ्रष्टाचारी सरकारला मशाल चूड लावल्याशिवाय गप्प बसणार नाही .आज शस्त्रपूजा केली त्यात बाकी शस्त्र आहेतच, पण शिवसेना प्रमुखांचा कुंचला त्याची पूजाही आम्ही केली. आता तुम्हा सगळ्यांची पूजा करतो आहे. कारण तुम्ही सगळं शस्त्रं आहेत. एकीकडे अब्दालीसारखी माणसं, यंत्रणा, केंद्रात सत्ता असं सगळं आहे. यांनी मनसुबा आखला की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण ही शिवसेना नाही ही वाघनखं आहेत जी माझ्यासमोर बसली आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले

![]()











