• Latest
  • Trending

छगन भुजबळ वेगळा निर्णय घेणार का ?

June 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

छगन भुजबळ वेगळा निर्णय घेणार का ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची मागणी

नाशिक: महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांआधी अनेक भूकंप बघायला मिळाले. मात्र आता विधानसभा आधी सत्तेत असलेल्या महायुतीच्या गोटात भूकंप होण्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच आज मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबईच्या वांद्रे येथील एमईटी सेंटर येथे ही बैठक पार पडली.पाच तास चाललेल्या या बैठकीत समता परिषदेच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यानी छगन भुजबळ यांच्याकडे वेगळा निर्णय घ्या, अशी मागणी करण्यात आल्याचे समजते.आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यानी बोलून दाखवली,साहेब तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या,आपल्यासाठी सर्वच ठीक नाही त्यामुळे हीच ती वेळ आहे. अशी मागणीच समता परिषदेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यानी घेतल्या मुळे राजकीय वर्तुळात मंत्री छगन भुजबळ कोणता निर्णय घेतात यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी स्वता अमित शहा यांनी छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी सुचवले होते मात्र शेवटपर्यंत एकमत होत नसल्याने भुजबळ यांनी संतापून आपण या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यावेळी देखील छगन भुजबळ हे प्रचारात सक्रिय नव्हते. यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी छगन भुजबळ इच्छुक होते मात्र यावेळी देखील त्यांना राज्यसभेची संधी न मिळता ती सुनेत्रा पवार यांना मिळाली त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आणि आज समता परिषदेच्या कार्यकर्त्यानी साहेब आता निर्णय घ्या असे म्हटल्याने भुजबळ यांच्या नाराजीला पृष्ठी मिळत असून भुजबळ वेगळा निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Loading

Previous Post

मैं नरेंद्र दामोदरदास मोदी… तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेतली शपथ

Next Post

अजित पवार गट ठरतो आहे महायुतीला ओझे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White