माजी नगरसेवकाने दिली माझ्यावर गोळीबाराची सुपारी -सुधाकर बडगुजर

नाशिक : आरपीआयचे (आठवले गट) पदाधिकारी असलेले अँड प्रशांत जाधव यांच्यावर अडीच वर्षांपूर्वी गोळीबार झाला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकरण तापले असून यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचे नाव आल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबार प्रकरणात पोलीस पथके दीपक बडगुजर यांच्या मागावर असून त्याला लवकर अटक करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. चौकशी झाल्यानंतरच कारवाई होण्याची शक्यता आहे. संशयित गुन्हेगार आणि दीपक बडगुजर यांच्यात काही संभाषण झाले किंवा कुठली आर्थिक देवाण-घेवाण झाली का ? यासंबंधी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे समजते. मुख्य म्हणजे या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित मयूर बेद याने गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर यांचा सहभाग असल्याचे सांगितले होते बडगुजर यांचा गौम्यस्फोट गोळीबार प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला असून माझ्यावर गोळीबार करण्याची सुपारी एका माजी नगरसेवकाने दिली होती. असा सनसनाटी आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला असून एका गुन्ह्यातील संशयित आरोपीने पोलिसांना माझ्यावरील संभाव्य हल्ल्याची माहिती दिली होती. मात्र ही बाब पोलिसांनी रेकॉर्डवर घेतली नाही. मुख्य म्हणजे गोळीबार प्रकरणात मुलाचे नाव समोर आल्यानंतर बडगुजर यांनी पोलिसांवर हा आरोप केला असून तो नगरसेवक कोण व कोणत्या पक्षाचा आहे हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.

![]()












