मनाचा थरकाप उडवून देणाऱ्या या व्हिडिओने शहरात खळबळ

नाशिक : विल्होळी शिवारात सोमवारी (दि 13)मुंबई आग्रा महामार्ग लगत एका दाम्पत्याने कंपनी कामगार असलेल्या सुरज कुमार मोहनलाल सोळंके(वय 40) याच्यावर प्राण घातक हल्ला चढविला होता. हल्ला चढवितानाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरून एका संशयित दांपत्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठहर मै आता……इतना क्या काम है…… सुबह से परेशान करके रखा है…..असे म्हणत सुरज मोहनलाल सोलंकी (वय 40) हा युवक घराबाहेर पडला. या दरम्यान नासिक पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील विल्लोळी शिवारात कटारिया कंपनीसमोर एका महिलेने सोळंकी याच्या मानेवर डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यापूर्वी या महिलेसह एकाने गंभीर जखमी असलेल्या सोलंकी याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि खाली कोसळला याचा फायदा घेत महिलेने त्याच्यावर वार केले तेव्हा तेथे काळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण वार करीत असताना उघड्या डोळ्यांनी पाहत होता. या घटनेचा थरकाप उडविणारा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याने खुनाची चर्चा वाऱ्यासारखी नाशकात पसरली. मुख्य म्हणजे त्यावेळी त्या महिलेचा पती सुद्धा घटनास्थळी उभा राहून हा सगळा प्रकार बघत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून समोर आले होते. मानवी मनाचा थरकाप उडून देणाऱ्या या व्हिडिओने शहरात एकच खळबळ उडाली होती. नाशिक शहराच्या वेशीवर भरदिवसा अशा प्रकारे कोयत्याने एखाद्या व्यक्तीला महिले कडून ठार मारण्याचा प्रयत्न धक्कादायक होता. हल्ल्यानंतर पती आणि पत्नी दुचाकीने पसार झाले होते गुन्ह्यात वापरलेला कोयताही त्यांनी घटनास्थळाहून उचलून सोबत नेल्याचे व्हिडिओत दिसते. या प्रकरणी तालुका पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अज्ञात महिला व पुरुषावर दाखल केला. यानंतर तपासाला वेग देण्यात आला संशयित महिला व तिच्या पतीला ग्रामीण पोलिसांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील गावातून ताब्यात घेतल्याचे समजते त्याची मृत्यू बरोबर झुंज सुरू– या हल्ल्यात सोलंकी हा गंभीर जखमी झाला असून जिल्हा रुग्णाला त्याची मृत्यूची झुंज सुरू आहे. सोलंकी याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले सोलंकी नाशकात कसा आला ? सोलंकी याला मधुमेह असून त्याच्या पायाला गंभीर इजा झाल्याने पुढच्या दोन दिवसांनी पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. सुरज हा मूळचा अहमदाबादचा रहिवाशी असून सध्या तो नाशिकमध्ये स्थायिक होता. द्वारका जवळील ट्रॅक्टर हाऊस जवळील घर बदलून तो व त्याची वहिनी नानावली जुने नाशिक येथे राहण्यास आले होते. तो वाडीवरे येथील पेलीकन कंपनीत कार्यरत होता. मागील काही काळापासून तो घरीच होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरज कुमार फोनवर कोणाशी तरी वाद घालत रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्यावेळी त्याची वहिनी मेघा सोलंकी यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकून न घेता निघून गेला सुमारे तासाभराने त्याचे दोन्ही मोबाईल बंद आढळले.

![]()












