• Latest
  • Trending

कुस्तीपटू पैलवानाच्या खुनातील संशयितच निघाला, 5 कोटींचे सोने चोरणारा मास्टरमाइंड…..

May 13, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कुस्तीपटू पैलवानाच्या खुनातील संशयितच निघाला, 5 कोटींचे सोने चोरणारा मास्टरमाइंड…..

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

फायनान्स कंपनीतील शिपाई पोलिसांनी केला जेरबंद

गंगापूर रोड :परिसरातील गृह कर्ज सहाय्य करणाऱ्या आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत काही दिवसांपूर्वी कार्यालयातील सेफ्टी लॉकर उघडून दोघा मास्कधारी अज्ञात चोरट्यांनी चार कोटी 92 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा उलगडा सात दिवसांनी झाला असून याच बँकेतील शिपाई तुकाराम देवराम गोवर्धने  (रा सांजेगाव तालुका इगतपुरी ) याच्या मदतीने तीन जणांनी कट रचून सोने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील चक्रावून टाकणारी घटना म्हणजे नाशिक मुंबई महामार्गावर राजुर फाट्याजवळ सांजेगाव तालुका इगतपुरी येथील कुस्तीपटू भूषण लहामगे याचा अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडत तसेच धारदार शस्त्राने वार करत खून केला होता. या प्रकरणातील खून झालेला भूषण लहामगे त्याचा चुलत भाऊ वैभव लहामगे याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या खुनातील संशयित वैभव लहामगे हाच नाशिक शहरातील फायनान्स कंपनीतून 5 कोटींचे दागिने चोरणारा मास्टरमाइंड निघाला. शहराच्या गजबजलेल्या गंगापूर नाका परिसरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरांनी घुसून जवळपास 4 कोटी 92 लाखांचे दागिने लंपास केले होते. त्यातील एकाने कोरोना सेफ्टी सूट तर दुसऱ्याने जीन्स टी शर्ट घातला होता. दागिने घेऊन पोबारा करणारे चोर सीसीटीव्हीत कैद झाले होते. यातील संशयित हे बँकेच्या खिडकीतुन उतरत दुचाकीवरून फरार झाल्याचे दिसत होते.त्यामुळे पोलिसांनी चोरटे ज्या रस्त्याने गेले, त्या रस्त्यावरील सीसीटीव्हीवरून त्यांचा माग काढला. सुमारे 11 किलोमीटर अंतराचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यानंतर पोलिसांनी सिडको परिसरातील महाराणा प्रताप चौकातील सतीश चौधरी व रतन जाधव या चोरट्यांची ओळख पटली मात्र पोलीस येण्यापूर्वीच ते चोरटे फरार झाले. मात्र पोलिसांनी पुढील चौकशी सुरू ठेवत या दोघांचे बँकेत कोणी ओळखीचे आहे का ? याची माहिती घेतली असता याच बँकेतील शिपाई तुकाराम देवराम गोवर्धने बरोबर त्या चोरट्याचे संबंध असल्याची माहिती पुढे आली .पोलिसांनी लागलीच शोध घेत तुकारामला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. तर इकडे काही दिवसांपूर्वी नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा परिसरात प्रसिद्ध कुस्तीपटू भूषण लहामगे (40,रा सांजेगाव ता. इगतपुरी) हा घरी जात असताना त्याला वाटेत अडवून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला व चॉपरने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ संशयित वैभव लहामगे,काका यशवंत लहामगे,व काकू यांच्या विरोधात वाडीवरे पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. जमिनीसह आर्थिक वादातून भूषण याने हत्या केल्याचे तपासात समोर येत आहे. हत्येनंतर यशवंत लहामगे यास पोलिसांनी अटक केली तर पसार झालेल्या वैभवला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.अन त्याच्या काही तासांमध्ये बँकेतील दरोड्याचा उलगडा झाला तुकाराम गोवर्धने याने याही गुन्ह्यात वैभव लहामगेचे नाव सांगितले त्याला बँकेची माहिती, खिडकी, लॉकरची जागा, सीसीटीव्ही, अलार्म याची माहिती पुरवली त्यातून वैभव याने त्या दोघ्या चोरट्यांसोबत जवळपास 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, या घटनेतील मास्टरमाइंड वैभव व बँकेतील शिपाई तुकाराम हे एकाच गावचे (सांजेगाव,इगतपुरी) रहिवाशी असून दोघे मित्र देखील आहेत. या घटनेबद्दल पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की यातील संशयित सतीश चौधरी याने चोरी केलेले सोने त्याची आई रेखा हिच्या ताब्यात दिले असून चोरलेल्या सोन्यापैकी काही सोने वितळून सोन्याच्या लगड तयार करण्यात आल्या होत्या त्या 39 लाख 52 हजार 350 रुपये किमतीच्या लगड जप्त करण्यात आल्या आहेत *वैभव हा सराईत गुन्हेगार* सन 2016 मध्ये ठाणे येथील चेकमेट सर्विसेस या कंपनीत दरोडा टाकून एक कोटी चाळीस लाखांची रक्कम जव्हार मध्ये लपविण्यात आली होती. या प्रकरणात देखील संशयित वैभव लहामगे होता. त्याचबरोबर सन 2023 मध्ये नाशिक पोलिसांनी सोलापूर एमडी कारखाना प्रकरणात अमोल वाघ याला अटक केली होती अमोल हा वैभव सोबत ठाण्याच्या दरोड्यात सहभागी होता. त्यावेळी कारागृहात त्यांनी इतर साथीदारांंबरोबर एमडी ड्रग्जची माहिती घेतली होती. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिताराम कोल्हे यांनी युनिट एक व दोनच्या पथकास मार्गदर्शन  केले त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हस्के, प्रवीण वाघमारे, नाजिम पठाण, संदीप भांड, शरद सोनवणे विशाल देवरे ,देविदास ठाकरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, किरण शिरसाट आदींच्या पथकाने केली

Loading

Previous Post

नेत्यांनी खासदार-आमदार व्हायचं मग आम्ही नगरसेवक केव्हा व्हायचं ?

Next Post

मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच नाशकात राजकीय वातावरण तापले…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White